Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी भाजपकडून कुरघोडी? बच्चू कडूंचा मोठा आरोप

Bachchu Kadu On BJP : "अमरावतीत आमचे दोन आमदार असताना भाजपनं नवनीत राणांना परस्पर उमेदवारी जाहीर केली, आता..."
bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawar
bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawarsarkarnama

एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी अजित पवार यांना भाजपनं सोबत घेतलं. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात शिंदे गट आणि अजित पवार गटाला भाजपनं बुक्क्यांचा मार दिला, अशी टीका प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी केली आहे.

आम्ही महायुतीकडे जागांची मागणी करणार नाही. विधानसभेची तयारी जुलै ते ऑगस्ट महिन्यात करू. सप्टेंबर महिन्यात पुढे कसं जायचं ते ठरवू. पण, विधानसभेच्या 20 ते 25 जागांवर आम्ही तयारी करत आहोत, असं मोठं विधानंही कडूंनी (Bacchu Kadu) केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

बच्चू कडू म्हणाले, "परभणी, हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलले नसते, तर शिंदे गटाचे अधिक खासदार निवडून आले असते. शिवसेनेनं कुणाला कुणाला उमेदवारी द्यायचे हे भाजप ठरवत होते. भाजपनं सर्व्हेच्या नावाखाली हेमंत पाटील, भावना गवळी यांचं तिकीट कापलं. तिकीट वाटपात नाक दाबून शिंदे गट आणि अजित पवार गटाला बुक्कांचा मार दिला."

"अजितदादांना दोन उसने उमेदवार देण्यात आले. असा युती धर्म असतो का? महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आल्यानंतर सगळं सुरळीत सुरू होते. पण, शिंदे यांना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं," असा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे.

bacchu kadu devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Sanjay Raut : लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरलं तर तो वाघ होत नाही...

"अमरावतीत आमचे दोन आमदार असताना भाजपनं नवनीत राणांना परस्पर उमेदवारी जाहीर केली. आता उमेदवार पडला म्हणून नाराजीच्या बोंबा ठोकल्या जात आहेत. हे चुकीचं आहे. युतीनं परस्पर उमेदवार जाहीर केले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील," असंही कडूंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com