Ajit Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद; म्हणाले, 'हा दिवस माझ्यासाठी...'

Ajit Pawar's emotional speech to Baramatikars during campaign: '...त्यांचा अंदाज चुकलेला आहे, त्यांना माहिती नाही आपलं नाही किती जवळचं आहे.' असंही अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Vidhansabha Election: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपच्या दिवशीची शेवटची सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत पार पडली. आज अजित पवारांनी सकाळापासून विविध मतदारसंघात चार सभा घेतल्या.यासभेला बारामतीकरांची प्रचंड गर्दी दिसून आली. अजित पवारांनी या सभेतून बारामतीकरांना भावनिक साद घातल्याचे दिसून आले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'बारामतीमध्ये महायुतीकडून अजित पवार तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवार घरण्यात पहिल्यांदाच ही निवडणुकीची लढाई पार पडत आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष येथील निवडणुकीकडे लागले आहे.'

Ajit Pawar
Supriya Sule : सोलापुरातील पैसे वाटपप्रकरणी राष्ट्रवादी मोठे पाऊल उचलणार; सुप्रिया सुळेंनी केले सूतोवाच

याशिवाय 'हा दिवस माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. तुम्ही मला सातवेळ आमदार आणि एकवेळा खासदार केलं आहे. आता आठव्यांदा मी आमदारकीसाठी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो. ' असंही अजित पवार यांनी म्हटलं.

Ajit Pawar
Vinod Tawde : मोदी-अदानी संबंधांचा राहुल गांधींनी 'सेफ' उघडला; भाजपच्या तावडेंचा आमच्याकडे 'कपाट'भर असल्याचा इशारा ...पाहा VIDEO

याचबरोबर 'आजच्या सभेसाठी अनेकांना बसण्यास जागा मिळाली नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी या सभेचं आयोजन केले त्यांचा अंदाज चुकलेला आहे. त्यांना माहिती नाही की आपलं नातं किती जवळचं आहे. सगळ्यांचे डिपॉझिट जप्त करणारे फक्त बारामतीकरच असू शकतात.' असंही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com