Ajit Pawar: अजितदादांच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार अन् धर्मांतराचा आरोप; चाकणकरांनी केल्या पोलिसांना 'या' महत्त्वाच्या सूचना

NCP Leader Rape Case Shantanu Kukde News: पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे यांच्यावर पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Rupali Chakankar News
Rupali Chakankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची निगडित असलेल्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शंतनू कुकडेवर केले आहे. यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना पत्र पाठवत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे यांच्यावर पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींचे शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार याची पोलिस चौकशी करीत आहेत.

दरम्यान या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये रूपाली चाकणकर यांनी पुण्यातील कॅम्प परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजु मुलींचे शोषण तसेच आर्थिक व्यवहार झाल्याबाबतची बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून धर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेची नोंदणी आहे किंवा नाही याबाबतही सत्यता पडताळून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Rupali Chakankar News
Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत CJI संजीव खन्ना यांचा मोठा निर्णय; यशवंत वर्मा यांच्या शपथविधीला...

या प्रकरणी तथ्य तपासून योग्य ती नियमानुसार सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तसेच कारवाई बाबतचा अहवाल तत्काळ महिला आयोगाला पाठवावा, अशा सूचना देखील रूपाली चाकणकरांनी केल्या आहेत.

चाकणकार म्हणल्या, पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींचे शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार याची पोलीस चौकशी करीत आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी, वेश्याव्यवसाय आरोप याबाबत ही तपासात सत्यता समोर येईल. राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करीत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीची सुरक्षितता तसेच समुपदेशन यासाठी ही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com