Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? चिंचवडला चार दिवसांत दोन गटांची बंडाळी

Two groups of former corporators of NCP Pune Chinchwad split : अजित पवार यांच्या बालेकिल्यात काही आलबेल नाही, चार दिवसांत त्यांना दोन आव्हानं मिळाली असल्याने पक्ष संघटनेच्या नेतृत्वावर आणि विस्तारावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागली आहे.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीतील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बालेकिल्यात म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षात सारे काही आलबेल नसल्याचं गेल्या काही दिवसांत दिसले आहे.

कारण गेल्या चार दिवसांत त्यांच्या पक्षात बंडाची दोन निशाणे फडकली गेली आहेत. लोकसभेतील अपयशानंतर आगामी विधानसभेला त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ते घातक ठरणार असल्याचं निरीक्षणं नोंदवली जाऊ लागली आहेत.

अजितदादांच्या अत्यंत विश्वासातील, अशा चार मातब्बर माजी नगरसेवकांनी 25 तारखेला पत्रकार परिषद घेऊन त्यांना पहिला 'जोर का धक्का' दिला. त्याद्वारे त्यांनी भाजपचे (BJP) आमदार असलेला शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे घेत, तिथं नवीन चेहरा (म्हणजे त्यांच्या गटातील) उमेदवार देण्याची मागणी केली. अन्यथा 'तुतारी' फुंकणार असल्याचा इशारा दिला.

Ajit Pawar 1
Pravin Darekar : आमदार पवार 'महाराष्ट्राचं नेतृत्व' करणार; शरद पवारांच्या विधानावर प्रवीण दरेकरांनी टायमिंग साधलं

दरम्यान, चार दिवसांत त्यांना पक्षातील आणखी काही माजी नगरसेवकांची साथ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन बंडाचा इशारा दिला. यातून अजितदादांची (Ajit Pawar) त्यांच्यात आवडत्या शहरात 'दादा'गिरी कमी झाली की काय? अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे. तसंच त्यांच्या पक्षात त्यातही चिंचवडमध्ये चाललंय, तरी काय? अशी विचारणा होऊ लागलीय.

Ajit Pawar 1
Maha Vikas Aghadi : 'MVA' मध्ये जागा वाटपाचा 'निकष' ठरला; किती जागा कोणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता!

भोईर यांचा 'निश्चय' अन् 'कार्यक्रम'

आतापर्यंत आपल्यावर फक्त अन्यायच झाला असल्याने आता आपण चिंचवड विधानसभा कुठल्याही परिस्थिती लढणार असल्याचा निर्धार माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बोलून दाखवला. जेव्हा जेव्हा आपण आमदार होण्याचा निश्चय केला, तशी चर्चा झाली, फ्लेक्स लागले, तेव्हा तेव्हा सर्वांनी मिळून आपला 'करेक्ट' कार्यक्रम केला, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भोईर यांचे पत्ते अजून 'क्लोज'च

दरम्यान, चार दिवसांपूर्वी अजितदादांना आव्हान दिलेल्या त्यांच्या चार नगरसेवकांनी 'तुतारी' फुंकणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र,त्यांच्यासारखाच बंडाचा इशारा दिलेल्या भाऊसाहेब भोईर यांनी, मात्र लगेच आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. त्यामागे त्यांना विधानपरिषदेचे मिळण्याचे गणित असण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबरला सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांच्या महानिर्धार मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते 'पेटती मशाल' हाती घेणार की 'तुतारी' फुंकणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com