Baramati Election : सस्पेन्स संपला, अजितदादांनी बारामतीत उतरवला तगडा उमेदवार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपनेही विरोधात थोपटले दंड

Ajit Pawar nominates Sachin Satav : बारामतीत शेवटच्या क्षणापर्यंत नावे गोपनीय ठेवत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी व भाजपकडून केला गेला. अनेक इच्छुकांना अगदी शेवटच्या क्षणी फोन आले व त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
Local Body Electons Baramati
Local Body Electons BaramatiSarkarnama
Published on
Updated on

NCP Baramati politics : आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी बारामतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुरस्कृत आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिहेरी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी व भाजप बारामतीत एकमेकांविरोधात नगरपरिषदेत लढणार आहेत.  

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. 17) सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी शेवटच्या क्षणी गर्दी  केल्याने बारामती नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. तीन वाजता दरवाजे बंद करुन आतमध्ये असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरुन घेण्यात आले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजप पुरस्कृत आघाडीकडून गोविंद देवकाते यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे नाव एक-दोन दिवसात जाहीर केले जाईल, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.

Local Body Electons Baramati
Local Body Elections : महत्वाची बातमी : ‘स्थानिक’च्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार? आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाने विचारला जाब, सोपा आदेश गुंतागुंतीचा केला...

बहुजन समाज पक्षाकडून काळूराम चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मित्रपक्षांसह निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.

युगेंद्र पवार म्हणाले, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यासह काही अपक्ष उमेदवार सोबत आलेले आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत तसेच प्रचाराच्या मुद्यांबाबत आम्ही काही दिवसांत माहिती देणार आहोत. यंदा युवकांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन चेह-यांना नगरपरिषदेत काम करण्याची संधी देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

Local Body Electons Baramati
Bihar Election Result : मोदी-नितीशकुमार लाटेतही शिक्षकाकडून ‘NDA’चा गड उद्ध्वस्त; बड्या नेत्याला चारली धूळ

भाजपचे अविनाश मोटे व गोविंद देवकाते यांनीही भाजप तीस जागांवर, राष्ट्रीय समाज पक्ष चार जागांवर तर इतर ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देत पूर्ण 41 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली. भाजपने अत्यंत गोपनीय पध्दतीने मोट बांधून शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करत महायुती असली तरी बारामतीत राष्ट्रवादीविरुध्द दंड थोपटले आहेत.

बारामतीत शेवटच्या क्षणापर्यंत नावे गोपनीय ठेवत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी व भाजपकडून केला गेला. अनेक इच्छुकांना अगदी शेवटच्या क्षणी फोन आले व त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेकांची यात मोठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही राष्ट्रवादीत युती होणार अशी चर्चा होत होती, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

अजित पवारांचे बेरजेचे राजकारण....

दुसरीकडे अजित पवार यांनी मागील निवडणूकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या सुनिल सस्ते, विष्णूपंत चौधर व जयसिंग देशमुख या तिघांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी देत बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com