Bihar Election Result : मोदी-नितीशकुमार लाटेतही शिक्षकाकडून ‘NDA’चा गड उद्ध्वस्त; बड्या नेत्याला चारली धूळ

Raniganj constituency Result : आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी अविनाथ यांना २०२० मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्याआधी ते सरकारी शाळेत शिक्षक होते. या निवडणुकीत त्यांचा केवळ २ हजार ३०४ मतांनी पराभव झाला होता.
Nitish Kumar and Narendra Modi
Nitish Kumar and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Bihar political news : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लाटेत महाआघाडीचा सुपडासाफ झाला. भल्याभल्या नेत्यांना पराभवाचा झटका बसला. पण या लाटेतही एका शिक्षकाने एनडीएचा गड उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम केला आहे. तब्बल 20 वर्षांपासूनची एनडीएची मक्तेदारी या शिक्षकाने मोडीत काढल्याने संपूर्ण बिहारमध्ये त्यांचीच चर्चा सुरू आहे.

अविनाश मंगलम असे या शिक्षकाचे नाव आहे. ते अररिया जिल्ह्यातील राणीगंज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांनी संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा 8 हजार 530 मतांनी पराभव केला आहे. मागील 20 वर्षांपासून या मतदारसंघावर एनडीएचे वर्चस्व होते. कधी भाजप तर कधी जेडीयूचा उमेदवार या मतदारसंघात हमखास निवडून यायचा.

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी अविनाथ यांना २०२० मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्याआधी ते सरकारी शाळेत शिक्षक होते. या निवडणुकीत त्यांचा केवळ २ हजार ३०४ मतांनी पराभव झाला होता. पण त्यांनी हार मानली नाही. मागील पाच वर्षे ते निवडणुकीची तयारी करत होते. त्यांच्या वडिलांनी २०२६ मध्ये सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. मात्र, २०२१ च्या पंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून अविनाश हे संपूर्ण जिल्ह्यात सक्रीय झाले होते. 

Nitish Kumar and Narendra Modi
Chandrakant Patil News : 'राष्ट्रवादी'च्या चिन्हाचा निर्णय चंद्रकांतदादांनीच केला जाहीर; अजितदादांनाही सूचना दिल्याचा दावा

मागील विधानसभा निवडणुकीत अविनाश मंगलम यांना अचमित ऋषिदेव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी अविनाथ यांनी त्यांनाच पराभवची धूळ चारत विधानसभा गाठली. या मतदारसंघात २००५ च्या निवडणुकीपासून भाजप किंवा जेडीयूचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आरजेडीसाठी सोपी नव्हती.

Nitish Kumar and Narendra Modi
Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांना झटका; आटपाडीत झाला 'करेक्ट कार्यक्रम'

राणीगंज मतदारसंघात आरजेडीला २००० च्या निवडणुकीनंतर पुन्हा विजय मिळवता आला नव्हता. २००० मध्ये आरजेडीच्या तिकीटावर यमुना प्रसाद राम निवडून आले होते. त्यानंतर २००५ पासून सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला. तर २०१५ आणि २०२० मध्ये ही जागा जेडीयूकडे गेली होती. त्यामुळे यावेळीही जेडीयूलाच विजय मिळेल, असा अंदाज वर्तविली जात होता. पण मोदी-नितीशकुमार लाटेतही अविनाश यांनी जोरदार लढत देत अखेर आमदारकीला गवसणी घातली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com