Ajit Pawar On Girish Bapat : "खरंतर बापटांना २०१४ मध्येच..." ; अजित पवारांनी सांगितली आठवण !

Girish Bapat Death : अनेक नेते गेल्यावर आपण म्हणतो पोकळी निर्माण झाली पण...
Ajit Pawar Girish Bapat
Ajit Pawar Girish BapatSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे ज्येष्ठ नते व पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दोन दिवसांपुर्वी निधन झाले. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी बापट यांना श्रद्धांजली वाहीली. अनेक राजकीय नेते, सामाजिक व्यक्तिमत्वांनी बापट यांचे कुटुंबियांची भेट घेऊन सात्वंना व्यक्त केली होती. राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बापट कुंटुंबियांची भेट घेतली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, "१९९१ साली मी पुण्याच्या राजकारणात आलो. १९९५ मध्ये बापट पहिल्यांदा कसबा विधानसभा मधून निवडून आले आणि तेव्हा पासून आम्ही आमदार म्हणून सभागृहात एकत्र काम केलं. सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत होती. कधी ही टोकाची भूमिका घेऊन त्यांनी कामकाज केलं नाही. अनेक नेते गेल्यावर आपण म्हणतो पोकळी निर्माण झाली, पण खरोखर भाजपला पुणे शहरात वाढवण्याचे काम कोणी केलं असेल तर गिरीश बापट यांनी केलं.

Ajit Pawar Girish Bapat
BJP : भाजप मंत्र्याच्या घरावर झळकले 'मोदी हटाओ देश बचाओ' चे बॅनर ; काय आहे प्रकरण ?

"बापट यांना २०१४ मध्येच खासदार बनायचंय होतं. बापटांनी मला सांगितलं की, "अजित आता आमदारकी बस झाली मला खासदार व्हायचं आहे. परंतु तेव्हा भाजप ने अनिल शिरोळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे त्यांना आमदार व्हावं लागलं. त्यानंतर सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आलं आणि बापट साहेब यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, अशी आठवण पवारांनी सांगितली.

"सगळ्यांच्या मध्ये मिसळून राहणार व्यक्तिमत्व आणि मैत्री सांभाळण्याचे काम गिरीश बापटांनी केलं. पक्षात वैचारिक भूमिका वेगळी, त्यांचे नेते वेगवेगळे पण, मैत्री म्हणून तर सगळ्यांशी मिळून मिसळून, वागायचे ते वाखण्याजोगी आहे. आमच्यामध्ये अनेक बैठक झाल्या, पण यात आमच्या मध्ये कधी ही ताणतणाव झाला नाही, असे ही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Girish Bapat
Ajit Pawar News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याच्या वडेट्टीवारांच्या भूमिकेवर अजितदादा संतापले,म्हणाले...

"बापट साहेब अत्यंत मिश्किल होते. काही नावं त्यांनी मला दिली आणि ती मी पुढे बोललो आणि ती फार दूर पर्यंत प्रसिद्ध झाली. पण त्याचे खरे सूत्रधार बापट साहेब होते. बापट साहेब आपल्यामधून गेले आहेत, हे आजही पटत मनाला पटत नाही," अशी भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com