PMC Election : 'आम्ही सत्तेत असताना कोयता गँग नव्हती, त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली'; अजितदादांचा भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar slams BJP leaders over Pune water crisis : 'आज पुण्यात नळाला पाणी नाही, टँकर माफिया वाढलेत. वॉल बंद करत टँकर वाढविण्याचे उद्योग करणाऱ्या अवलादी आपल्या भागात आहेत. पुण्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा माझा प्रयत्न सुरू असून या टँकर माफियांकडे मी पाहणार आहे.'
BJP and NCP candidates campaigning in East Pune’s Ward 3 and 4, where the Pathare family entry has intensified the Pune PMC election battle.
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Jan : पहिली सत्तेची पाच वर्षे आणि नंतरची चार वर्षे, अशी नऊ वर्षे त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली, अशी नाव न घेता पुणे भाजपच्या नेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. 'सातारा रस्ता परिसरातील उमेदवारांच्या पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पद्मावती येथे जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी अजितदादा म्हणाले, आज पुण्यात नळाला पाणी नाही, टँकर माफिया वाढलेत. वॉल बंद करत टँकर वाढविण्याचे उद्योग करणाऱ्या अवलादी आपल्या भागात आहेत. पुण्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. मुळशी धरणातून पाणी आणण्याचा माझा प्रयत्न सुरू असून या टँकर माफियांकडे मी पाहणार आहे.

ही निवडणूक पुढील पाच वर्षांसाठी पुण्याची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची, याचा निर्णय घेणारी आहे. पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराची सध्याची अवस्था पाहून वाईट वाटते. आम्ही सत्तेत असताना पुण्यात कोयता गँग नव्हती, वाढलेली गुन्हेगारी नव्हती. मला कधीच पूर्ण सत्ता मिळाली नाही, तरीही सर्व घटकांना सोबत घेत काम केले, असं म्हणत त्यांनी ना न घेता पुण्यातील भाजपच्या मागील काळातील कारभाऱ्यांवर टीका केली.

BJP and NCP candidates campaigning in East Pune’s Ward 3 and 4, where the Pathare family entry has intensified the Pune PMC election battle.
Amol Balwadkar : अमोल बालवडकरांचं तिकिट का कापलं?; व्हायरल व्हिडिओकडे बोट दाखवत चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण...

तर समाविष्ट ३२ गावांतही परिस्थिती वाईट आहे. ही निवडणूक पुण्याची आहे. तुम्ही केंद्रात आणि राज्यात युतीच्या माध्यमांतून योग्य सरकार निवडले. तसे पुण्यातील योग्य स्थानिक नेते निवडा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. नळाला नियमित पाणी, वाहतूक कोंडीतून मुक्तता, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सेवा, प्रदूषणमुक्त पुणे या पंचसूत्रीसह क्रीडा आणि कला क्षेत्राचा विकास यासाठी ठोस नियोजन केले आहे.

BJP and NCP candidates campaigning in East Pune’s Ward 3 and 4, where the Pathare family entry has intensified the Pune PMC election battle.
Uddhav Thackeray: "फडणवीसांनी हिंदू-मुस्लिम वादाशिवाय भाषण करून दाखवावं, त्यांना एक लाख रुपये देतो"; उद्धव ठाकरेंचं आव्हान

मात्र, सध्या स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून १,२०० कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी मंजूर झाले, पण प्रत्यक्षात केवळ ६०० कोटींचीच कामे झाली. टेंडरमध्ये रिंग करण्यात येत आहे. त्यामुळेच बदलाची गरज आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com