Pune News, 15 Oct : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहाटेपासून काम लागण्याची सवय आहे. त्याप्रमाणे आजही त्यांनी पहाटे लवकर मेट्रोच्या कामाची पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अजित पवारांनी मंत्रालयात बसून समस्या समजत नाही त्यासाठी ग्राउंडवर उतरावं लागतं असा सल्ला इतर नेत्यांना दिला.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 'मुठा नदी वर उभारण्यात आलेला मेट्रोचा पादचारी पूल पाहण्यासाठी मेट्रोने बोलवलं होत. असंच दुसऱ्या पुलाचं काम सुरु आहे. अधिकारी चांगलं काम केलं असेल तर कौतुक केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही भेट दिली.'
या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनी सांगितल्या नदीचे अस्वच्छता, भटकी कुत्री आणि छत्रपती संभाजी बागेमध्ये झालेल्या दुरावस्थेबाबत तक्रारी केल्या. तसंच या परिसरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बगीचा आणि साहित्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील केली तसंच काही गोष्टींच कौतुक केलं.
अशा पद्धतीने कामांची भेट घेतल्यानंतर नेमक्या समस्या कळतात मंत्रालयात बसून हे प्रश्न काळत नाही. राउंड मारला की गोष्टी पाहता येतात. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहीजे. त्यामुळे इथे येऊन सगळी पाहणी केली. इथे आल्याशिवाय प्रश्न कळत नाही. ओपन जिम आणि मुलांना खेळण्याचे स्पॉट केले पाहीजे.
ते झालं तर चांगला होईल. मला बारीक बघण्याची सवय आहे. दुसऱ्या पुलाचं काम डिसेंबर पर्यंत होईल. ज्या गोष्टी आढळल्या त्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या. किरकोळ त्रुटी सांगितल्या.' यावेळी भिडे पुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटर बोलताना अजितदादा म्हणाले, 'भिडे पूल फार जुना आहे. मागे कोकणात पूल पडला होता त्यावेळी जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणी वरती आला होता.
भिडे पूल देखील जुना आहे त्याच ऑडिट कराव असा सांगण्यात आले होते. हा ब्रिज जर उंच केला तर कितीही पाणी आला तर काही त्रास होणार नाही. ठाकरे बंधूंनी काल निवडणूक आयोगाची भेट घेतली त्याबाबत विचारला असता अजित पवार म्हणाले, कोणी कोणाला भेटावं हे त्यांनी बघावं. लोकशाहीत सगळ्यांना सगळ अधिकार आहेत. पारदर्शक निवडणूक होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक होईल. स्वायत्तता आपण निवडणूक आयोगाला दिली आहे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.