PMC Nivadnuk: पुण्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले 'जिजाई'; भाजपच्या बंडखोरांनी ठोठावले अजितदादांचे 'दार'

Ajit Pawar residence Jijai Pune political activity: दोन्ही पक्षातील इच्छुक, नेते, प्रमुख पदाधिकारी, आमदार यांनी पवार यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील "जिजाई" या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Ajit Pawar residence Jijai Pune political activity:
Ajit Pawar residence Jijai Pune political activity:Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका निवडणुकीमधील काल सोमवारचा संपूर्ण दिवस चांगलाच गाजला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी एकीकडे चाललेली चढाओढ, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने उपमुखमंत्री अजित पवार यांच्या एका भेटीसाठी गाठलेला उच्चांक. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, आमदारांचा राबता वाढत असतानाच, अचानक भाजपच्या नाराज बंडखोरांनी पवार यांचे "दार" ठोठावले.

भाजपवर नाराज झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी ही दादांची भेट घेत आपली "बार्गेनिंग पॉवर" दाखवून दिली. एकूणच सोमवारी शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले ते उपमुखमंत्री पवार यांचे "जिजाई" हे निवासस्थान !

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समवेत जाण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर पुण्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत निवडणूक लढण्याच्या चर्चेला सुरुवात केली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीला रामराम ठोकत अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा वाटप व चिन्हाचे कारण पुढे करत त्यांनी शुक्रवारी आपल्या निर्णयात अचानक बदल करून पुन्हा काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमवेत चर्चेला सुरुवात केली. मात्र नव्या निर्णयास २४ तास पूर्ण होण्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत बैठका सुरू केल्या.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जागा वाटप, चिन्हावरून चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी दोन्ही पक्षातील इच्छुक, नेते, प्रमुख पदाधिकारी, आमदार यांनी पवार यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील "जिजाई" या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, विशाल तांबे हे चार वाजता तेथून बाहेर पडले. त्याचवेळी भाजपच्या उमेदवारांच्या यादीतील नावे बाहेर येऊ लागली. या यादीत आपली नावे नसल्याने भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी थेट पवार यांचे " जिजाई" निवासस्थान गाठले.

भाजपचे धनजंय जाधव, मनसेचे जयराज लांडगे यांनी काही मिनिटातच राष्ट्रवादीत प्रवेश करत उपरणे गळ्यात घालून तेथून बाहेर पडणे पसंत केले. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या नीता मंजाळकर, आनंद मंजाळकर, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, तत्पूर्वी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आपल्या उमेदवारीचा "मार्ग" मोकळा केला.

Ajit Pawar residence Jijai Pune political activity:
Mahapalika Nivadnuk: एकनाथ शिंदेंच्या होमग्राऊंडवर अस्वस्थता; सभागृह नेत्याच्या पत्राने खळबळ,पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे

दरम्यान, रात्री आठ वाजले तरीही, पवार यांच्या निवासस्थानमोरील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर पोलिसांना बोलावून गर्दीवर नियंत्रण आणण्याची वेळ आली. गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी वातावरणाचा कानोसा घेत निवासस्थानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही अनेक आमदार, इच्छुक उमदेवार, प्रमुख पदाधिकारी व अन्य पक्षांचे बंडखोर पवार यांना भेटण्यासाठी तेथेच तळ ठोकून होते. संपूर्ण दिवस "जिजाई" निवासस्थान शहरातील राजकारणाचे प्रमुख केंद्र ठरले.

शिवसेनेने आणला कहाणी में ट्विस्ट !

भाजपकडून सन्मानपूर्वक जागा दिल्या जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, किरण साळी व अजय भोसले ६ वाजता "जिजाई" येथे दाखल झाले. भोसले यांनी गाडीत बसणे पसंत केले, तर धंगेकर यांनी पवार यांची भेट घेऊन जागा मिळण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र ही भेट "सदिच्छा भेट" असल्याचे सांगत धंगेकर यांनी आपल्या पक्षाची "बार्गेनिंग पॉवर"वाढविण्यावर भर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com