दसरा मेळाव्यातून शिंदेंचा शक्तीप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न; खरी शिवसेना ठाकरेंचीच

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या मुंबईतील निवासस्थानी दगडफेक केल्याने बडतर्फ करण्यात आलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आज (ता.८) सडकून टीका केली.

बेरोजगारी, महागाईवरून लक्ष हटविण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा हा केविलवाणा व नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात पवार यांनी आज महापालिका आयुक्त शेखरसिंह व पालिका प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारपरिषदेत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, मुस्लीम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन...

या वेळी ते म्हणाले, मूळ शिवसेना ही ठाकरेंचीच असून शिंदे हा गट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दसऱ्यानिमित्त या शिंदे गटाने मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची टीका त्यांनी केली. कारण या मेळाव्यात मुख्यमंत्री ओरडून भाषण करीत असतानाही लोकं निघून जात होते. खुर्च्या रिकाम्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, आजच्या आयुक्तांकडील बैठकीला राष्ट्रवादीचे शहरातील झाडून सारे नेते हजर होते. त्याकडे अजितदादांनी लक्ष वेधले. त्यांचा रोख हा आमदार बनसोडे, व माजी आमदार लांडे यांच्या अनुपस्थितीवरून येणाऱ्या बातम्यांकडे होता. मी शहरात येतो तेव्हा काही सहकाऱ्यांना कामे असतात, असे सांगत त्यांनी आम्ही सगळे बरोबर आहोत, असे ठामपणे सांगितले.

Eknath Shinde, Ajit Pawar
म्हणूनच शिंदेंनी ठाकरे सरकार पाडण्याचे मोठे धाडस केले; अजितदादा स्पष्टच बोलले

पिंपरी-चिंचवडला आमची सत्ता होती. तेव्हा शहर स्वच्छतेत टॉपला होते. आता ते १९ व्या क्रमाकांवर घसरले आहे. त्याला पालिका जबाबदार असून आपण कुठं कमी पडलो, याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणूक लांबल्याने इच्छूकांनी खर्च आता कमी करावा, असे ते म्हणताच मोठा हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com