म्हणूनच शिंदेंनी ठाकरे सरकार पाडण्याचे मोठे धाडस केले; अजितदादा स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांसह बंड करत भाजप सोबत सरकार स्थापन केले.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांसह बंड करत भाजप सोबत सरकार स्थापन केले. याच संत्तांतरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठे विधान केले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये, 'दोन-अडीच वर्षांपासून सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी वेडा नव्हतो. त्यासाठी काम सुरु होते, असा खुलासा केला होता. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी भाजपचे १०५ आमदार असूनही ते सत्तेत नसल्याने सत्तेत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते असे म्हटले.

Ajit Pawar News
'कमी महत्चाचे खाते मिळाल्यातून चंद्रकांत पाटलांचे आईवडिलांविषयी संस्कृतीहिन वक्तव्य!'

भाजपचे १०५ आमदार निवडून आल्यानंतरही सरकार स्थापन करता आले नाही. तरीही त्यांचे विविध मार्गांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरूच होते. आघाडी सरकार पाडण्यासाठी मोठी शक्ती कार्यरत होती. ती शक्ती पाठीशी होती म्हणूनच शिंदे यांनी एवढे मोठे धाडस केले, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar News
शिंदेंच्या याचिकेतील 'त्या' मुद्यावर ठाकरेंनी ठेवले बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कामगारांचे निलंबन मागे घेण्यात आल्यासंदर्भात विचारले असता, शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करणार, असा टोला पवार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com