Ajit Pawar : 'आधी काही केलं तर साहेब पांघरून घालायचे, पण आता....', कार्यकर्त्यांसमोरच अजितदादांनी काढली शरद पवारांची आठवण

Ajit Pawar on Sharad Pawar Reference : अजित पवार आज (ता.26) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्थानिकच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
Sharad Pawar And Ajit Pawar
Sharad Pawar And Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 26 Sep : 'आधी आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. मात्र, आता आपल्यालाच आपल्यावर पांघरून घालावं लागतंय,' असं वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे चुलते आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची आठवण काढल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार आज (ता.26) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्थानिकच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

तर राष्ट्रवादी पक्षातील फुटी संदर्भातील घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, 'मागचा आणि आताचा अजित पवार यात लय मोठा फरक आहे. त्यामुळे माझ्याकडे यायला संकोच करू नका.' अजितदादा असं म्हणताच एकच हशा पिकला.

Sharad Pawar And Ajit Pawar
Nagpur Politics : पदवीधरचा उमेदवार कोण? भाजप नेत्यांना आपला गेम होण्याची भीती

त्यानंतर ते म्हणाले, 'आपण आधी काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. पण आता आपल्यालाच पांघरून घालावं लागतंय. जसं वय वाढतं तसं बदलावं लागतं. वय वाढलं की मॅच्युरिटी येते.' तर शरद पवारांचा साहेब असा उल्लेख अजितदादांनी करताच एक एक कार्यकर्ता 'दादा चुलता पुतण्याचं नात' असं म्हटला.

Sharad Pawar And Ajit Pawar
Jayant Patil vs Gopichand Padalka : जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर वाद आणखी पेटणार, सांगलीतील मोर्चाला भाजपचे सभेने उत्तर! वाळवा तालुक्यातही...

त्याला उद्देशून अजित पवार म्हणाले, 'मला चुलता पुतण्याचं काही सांगू नको, आधीच्याही नको आणि आताच्याही चुलता पुतण्याचं काही सांगू नको,' त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका. कुणी काही वक्तव्य करतात ते वाईट बोलले म्हणून आपण वाईट पद्धतीने उत्तर द्यायचं ही आपली शिकवण नाही. राजकारण सुसंस्कृतपणाने करण्याचा विचार जपा. लोक काही बोलतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा आणि पुढे निघून जा, महत्व देऊ नका, असं सल्लाही अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com