Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar Pune : पालकमंत्री अजितदादांच्या कामाचा धडाका सुरू; अधिकारीही झाले 'चार्ज'!

Ajit Pawar takes charge of Guardian Minister of Pune : पीएमआरडीए, जिल्हा परिषद, महावितरण, क्रीडा विद्यापीठबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करणार
Published on

Pune Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांचे ४ ऑक्टोबरला खांदेपालट केली, तर काही ठिकाणी नव्याने पालकमंत्र्यांची नेमणूक केली. त्यानुसार पुणे जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे सोलापूर आणि अमरावतीचे कारभारी झाले, तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याची ही जबाबदारी दिली. त्यानंतर नऊ दिवसांनी त्यांनी पालकमंत्री म्हणून बैठक घेत अजित पवारांनी शुक्रवारपासून नवी इनिंग सुरू केली. (Latest Political News)

आढावा बैठकींचा सपाटा

पुण्यातून उचलबांगडी झाल्याने पाटील नाराज झाल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी मंत्री असल्याचे सांगत पुण्यात आढावा बैठकांचा सपाटा लावला होता. तो नुकताच थांबला आहे. त्यानंतर अजितदादांनी बैठक घेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या स्टाइलमध्ये काम सुरू केले. अजितदादांनी काम सुरू केल्याने पाटीलही पितृपक्ष संपताच प्रथम सोलापूर व नंतर अमरावतीची जबाबदारी घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, या नव्या इनिंगचा वापर अजितदादा हे आपला बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात आपल्या गटाची जोरात बांधणी करण्यासाठी करतील, यात शंकाच नाही.

Ajit Pawar
Nana Patole On Mungantiwar : मुनगंटीवारांची ‘पप्पू’ची टीका नाना पटोलेंना झोंबली, म्हणाले...

पुन्हा पालकमंत्री होताच अजित पवार अधिक अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केले आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच पुणे दौरा असून, त्यात ते पीएमआरडीए, जिल्हा परिषद, महावितरण, क्रीडा विद्यापीठ याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. (Maharashtra Political News)

स्वतःच्या स्टाईलने कामास सुरुवात

आघाडी सरकारच्या काळात ते पुण्याचे पालकमंत्री असताना दर शुक्रवारी विकासकामांचा आढावा घेत. त्यानंतर शनिवार, रविवार बारामतीला जायचे, हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. पाटील पालकमंत्री झाल्यावर बैठकांचा हा सपाटा कमी झाल्याचे बोलले जात होते. आता तो पुन्हा एकदा अजित पवारांनी त्यांच्या स्टाइलने काम करण्यास सुरुवात केल्याने वाढणार आहे.

पुणे जिल्हा परिषदअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. त्या कामांची सद्यःस्थिती, कामांसाठी आलेले अडथळे आणि कामांबाबत जिल्ह्यातून आलेल्या तक्रारींविषयी अजित पवार जलजीवन या मिशनचा आढावा घेणार आहेत. पीएमआरडीएच्या प्रकल्पाचे सादरीकरण ते पाहतील.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीबाबतच्या कामाची आढावा बैठक ते घेणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम, पुरातत्त्व विभाग, चाकण नगरपरिषद विकास आराखडा आणि कात्रज दूध संघाचाही ते आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अजितदादा आल्याने आता सुटीच्या दिवशीही किमान पुणे जिल्हा प्रशासनाला सकाळीच जाग येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Kolhapur Politics : बावनकुळेंनी निष्ठावंतांची समजूत घातली; पण नव्यांच्या शक्तिप्रदर्शनाने टेन्शन वाढविले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com