अजित पवारांच्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात `मोदी, मोदी, मोदी,` घोषणा

Pune Metro| Ajit Pawar| काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही
Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ज्यांना आदर्श मानतात त्याच शिवाजी महाराजांची ही भुमी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत, त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुणे मेट्रोच्या (Pune metro) उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. (Ajit Pawar Latest political news)

"मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या कार्यांच्या उत्तुंग विचारांचा आदर्श आपल्या सर्वांना पुढे घेवून जायचे आहे, असे म्हणतं त्यांनी राज्यपालांना व्यासपीठावरच सुनावले.

Ajit Pawar
"काँग्रेसच्या काळात प्रकल्पांच्या भूमिपूजनानंतर उद्घाटनाची वाट बघावी लागायची"

'मोदींना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं. पण पुण्यात काही नेत्यांच्या हट्टापायी मेट्रो सुरू व्हायला १२ वर्ष गेली. पण पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे, मेट्रो कधी आणि कशी सुरू करायची याला बराच काळ गेला.अखेर मेट्रोचं काम सुरू झालं अन् मेट्रो सुरूही झाली, असे म्हणत त्यांनी रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन विरोधी पक्षाला टोलाही लगावला.

पुणे महानगरपालिका आगामी काळात विस्तारीकरणाचा अहवाल तयार करत आहे. या नव्या मार्गाना मान्यता द्या, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. पिंपरी चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर,शिवाजीनगर ते खराडी या मार्ग सुरू करण्यास मदत दयावी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांमुळे नागपूर लवकर सुरू झाली, तशीच पुण्यासाठीही द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

विकास कामात राजकारण न आणता आम्ही काम करू, नदी सुशोभीकरण अन शुद्धीकरण हे प्रकल्प करत असताना पर्यावरणाकडे लक्ष देऊन काम व्हावे तसेच आम्हीही लक्ष देऊ, पर्यावरण आणि जैवविविधतेला हानी न पोहचता विकास कामे करु. त्याचबरोबर, सर्व वाहने पर्यावरणपूरक करू, यात ई बस अन मोटारसायकल यांच्या किमती कमी व्हावे हे केंद्राने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली. शहरातील चालू विकास कामे आणि आगामी काळातील विकासकामांबाबत अजित पवार यांचे भाषण सुरु असतानाच 'मोदी, मोदी' अशी उपस्थितांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर त्यानी भाषण संपवत सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com