Ajit Pawar On Supriya Sule : संसदपटू अन् सेल्फी! अजितदादांची सुप्रिया सुळेंवर पहिलीच टीका; नेमकं काय म्हणाले?

Baramati Politics : 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा विचार करून माझ्या उमेदवाराला निवडून आणून माझी राज्य आणि देशातील पत राखा.'
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati NCP Political News : मला काम करायला आवडते. पहाटे पाचला उठून कामाला लागतो. कामांची पाहणी करतो. काम चांगले झाले तर ठीक नाहीतर संबंधित कंत्राटदाराला, अधिकाऱ्यांना हिसका दाखवतो. मी रागावत असेल, पण काम चोख करतो. काम करत असल्यानेच माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात. जे कामच करत नाहीत, त्यांच्यावर आरोप होण्याचा प्रश्नच येत नाही. सेल्फी काढून, भाषणे ठोकून मतदारसंघातील कामे होत नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

बारामती येथील सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली आहे. मी देईल त्या उमेदवाराला अजित पवार समजूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले. या वेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघात फिरून आणि फक्त सेल्फी काढून लोकांची कामे मार्गी लागत नसतात. त्यासाठी ग्राउंडवर उतरून लोकांसाठी कामे करावी लागतात, असे अजित पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Baramati Lok Sabha Constituency : बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू; लोकसभेला उमेदवारी मिळणार?

खासदार सुळेंना (Supriya Sule) संसदपटू पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी संसदेत अनेक अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. यामुळे त्यांचा सात वेळा संसदपटू म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. हा संदर्भ देत अजित पवारांनी फक्त संसदेत भाषण करून लोकांची कामे होत नाहीत. कामे ही तडफेने, जोरकसपणे करावी लागतात. तसे असते तर मीही मुंबईत बसून छानपैकी भाषणे दिली असती. तसे केले असते तर बारामतीतील कामेच झाली नसती, असेही पवार म्हणाले.

आगामी लोकसभेचा (Lok Sabha Election) उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचेही पवारांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, आता तुम्ही म्हणाल की हा उमेदवार नवा आहे. मात्र, मागील सहा-सात वेळा निवडून आलेल्या खासदारांपेक्षाही हा नवा उमेदवार जास्त कामे करेल. हा अजित पवाराचा शब्द आहे. त्यामुळे काळजी करू नका. कुणाच्याही आवाहनाने भावनिक होऊ नका. महाराष्ट्राच्या समृद्धीचा विचार करून माझ्या उमेदवाराला निवडून आणून माझी राज्य आणि देशातील पत राखा. घड्याळ तेच पण वेळ नवी, असे म्हणत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही या वेळी फुंकले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ajit Pawar
Nanded Congress : अशोक चव्हाण भाजपत जाताच नांदेडमध्ये काँग्रेस आक्रमक; उचलले मोठे पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com