Ajit Pawar vs Murlidhar Mohol : अजितदादांसमोर मुरलीअण्णांची माघार नाहीच, आत्ता फैसाल निवडणुकीच्या मैदानात!

Maharashtra Olympic Association President Election : उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असा थेट सामान निवडणुकीच्या मैदानात होणार आहे. महाराष्ट्र ऑलिंपिंक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये लढत होईल.
Ajit Pawar| Murlidhar Mohol
Ajit Pawar| Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : महाराष्ट्र ऑलिंपिंक संघटना निवडणूकीत अजित पवार-मुरलीधर मोहोळ अशी थेट लढत होणार आहे. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज केले होते. शनिवारी (ता.18) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये थेट सामना होणार आहे.

चार उपाध्यक्षपदचा अपवाद वगळता इतर सर्व पदांसाठी कोणीही माघार घेतलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्र ऑलिंपिंक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवार यांनी सलग तीन वेळा भूषवले आहे. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या मैदानात आहेत.

दोन नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार असून तीन संघटनांचे प्रत्येक दोन सभासद या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे 60 मतदार नवीन अध्यक्ष अजितदादा की मुरलीअण्णा हे ठरवणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये लढत होत असल्याने ही निवडणूक दोघांसाठी देखील प्रतिष्ठेची असणार आहे.

Ajit Pawar| Murlidhar Mohol
Gunratna Sadavarte : 'पंडित नथुराम गोडसेंसाठी आनंद दिघे लढले, एकनाथ शिंदे आणि आमचा DNA एकच...', गुणरत्न सदावर्तेंचं वादग्रस्त वक्तव्य

अजित पवारांनी कबड्डी संघटनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तर, मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती महासंघाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दरम्यान, आदिल सुमारीवाला, दयानंद कुमार, प्रदीप गंधे, प्रशांत देशपांडे हे उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध असणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर, नामदेव शिरगावकर आणि संजय शेट्ये यांच्यात सरचिटणीसपदासाठी लढत होणार आहे.

Ajit Pawar| Murlidhar Mohol
Organ Trafficking Ahilyanagar : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! डाॅ. बहुरूपीसह पाच डाॅक्टरांकडून अवयवांची 'तस्करी'; मृतदेहाची परस्पर विल्हेवाट, गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com