Ajit Pawar : 'मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका' ; अजित पवार पत्रकारांवर भडकले!

Ajit Pawar warned reporters : जाणून घ्या, पुण्यातील पत्रकारपरिषदेतील नेमक्या कोणत्या प्रश्नावर दादांचा पारा चढला
Ajit Pawar
Ajit PawarSarakrnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी पुण्यात पत्रकारांवर चांगलेच भडकले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांना काही प्रश्न विचारले गेले. ज्यामध्ये शरद पवार यांची प्रतिक्रिया आणि मुख्यमंत्री शिंदेंचं अभिनंदन केलं का? याबाबत विचारणा झाली, असता अजित पवार भडकल्याचे दिसून आले. 'पत्रकारांनो मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका' असं त्यांनी सुनावलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी गुरुवारी पुणे विभागातील चार जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यामध्ये येणाऱ्या राज्याच्या बजेटमध्ये जिल्हा नियोजन समितीसाठी किती निधी देण्याची आवश्यकता आहे, यावर चर्चा करून आढावा घेतला. सांगली, सातारा, सोलापूर तसेच कोल्हापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्येक अधिकारी आणि पालकमंत्र्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी प्राधान्याने करावा, याबाबत आवश्यक त्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Shrinath Bhimale : पुण्यातील श्रीनाथ भिमालेंचं थेट मोदींना पत्र; केली मोठी मागणी

या बैठकीनंतर दिवसभरात काय झाले, याची सविस्तर माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत झालेल्या सविस्तर माहिती देऊन झाल्यानंतर अजित पवार यांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळणारी जीएसटी रक्कम यावर त्यांनी भाष्य केले. त्यानंतर पवार यांना मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांचीच खरी शिवसेना असा निर्णय देण्यात आला असून त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याचा प्रश्न येताच कोणी काय बोलले मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी शिवसेना पक्षाच्या निकालावर तुमचे मत काय? असे पवार यांना विचारले असता. ते म्हणाले, सरकार तर सुरूच आहे. तुम्ही जसा ' तो ' निर्णय ऐकला तसाच मी ऐकला आहे. जे न्यायाधीश असतात त्यांना अधिकार असतात. त्यांनी दिलेला निर्णय हा योग्यच समजतो. बाकीच्यांनी काय प्रतिक्रिया दिली, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला आहे, तुम्ही त्यांचे अभिनंदन केले का? असा प्रश्न येताच अजितदादांचा पारा चांगला चढला.

Ajit Pawar
Dheeraj Ghate : काँग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा : पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंचे टीकास्त्र!

ते म्हणाले, शिंदे यांना अभिनंदन कधी करायचं हे माझं मी ठरवेल.' पत्रकारांनो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका', असा एकप्रकारे त्यांनी पत्रकारांना दमच दिला. माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे, जे मला वाटते ते मी बोलतो. दिवसभरात इतके जण बोलत असतात. त्यावर तुम्ही मला काहीतरी विचारणार असाल तर कसे चालणार. आपल्याकडे वाचाळवीर तर भरपूर आहेत. रोज त्यांना काही ना काही स्टेटमेंट केल्याशिवाय झोपच येत नाही. प्रत्येक वाचाळवीरांना उत्तर देणे माझं काम नाही., असेही अजित पवार म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com