Pune Political News : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व पक्षीय नेते आणि विविध धार्मिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा दिवस भारतवासीयांसाठी ऐतिहासिक असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप नेते आणि माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे.
अयोध्यात सुमारे पाचशे वर्षांनंतर राम मंदिर उभे राहिले आहे. त्या मंदिराचा आता लोकार्पण सोहळा होणार आहे. हा देशातील नागरिक हा सोहळा उत्साहात साजरा करणार असल्याचा विश्वास भिमालेंनी व्यक्त केला. तसेच आपल्या पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे 22 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषीत करण्याचा आग्रह धरलेला आहे.
श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) म्हणाले, 'अयोध्येमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भगवान श्री राम विराजमान होणार आहेत, ही देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सोहळ्यासाठी प्रत्येक भारतीय आतूर झालेला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सुमारे 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संपूर्ण भारत देशात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. हा दिवस प्रत्येकजण दिवाळीसारखाच साजरा करणार आहे,' असा दावाही त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पत्राद्वारे भिमालेंनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे. ते म्हणाले, '22 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय सण घोषित करावी. तसेच दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा विचारही आपण करावा. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. तसेच सर्व नागरिकांना श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त होणाऱ्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे,' असेही त्यांनी म्हटले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.