Ajit Pawar News : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत फडणवीसांबाबत दिलेला शब्द अजितदादांनी पाळला नाही...

NCP Leader Ajit Pawar nagpur meeting : फडणवीसांबाबत सॉफ्टकॉर्नर आहे का ?
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

NCP Leader Ajit Pawar nagpur meeting : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा काल (रविवारी) नागपुरात झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या सभेत भाषण केले नाही.

याबाबत त्यांनी सभेपूर्वीच स्पष्टीकरण दिले होते. पण छत्रपती संभाजी नगर येथील वज्रमूठ सभेत दिलेला शब्द अजित पवारांनी पाळला नाही, याची चर्चा सध्या रंगली आहे.

तीन मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या झालेल्या वज्रमूठ सभेत आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar's Next Speech: पुढच्या सभेत अजितदादांच्या निशाण्यावर फडणवीस; नाव घेऊन भाषण करणार..

या सभेत भाजपचे नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणं आघाडीच्या नेत्यांनी टाळलं. यावर अजित पवारांना पत्रकारांनी विचारले होते. त्यावेळी अजितदादांनी पत्रकारांनी केलेली सूचना स्वीकारली होती. सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

"तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी सभेत मोदी, शाह यांचे नाव घेतलं. मात्र फडणवीस यांचं नाव घेऊन काहीही बोलला नाहीत. त्यांच्याविषयी सॉफ्टकॉर्नर आहे का? असा प्रश्न अजितदादांना पत्रकारांनी विचारला होता.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

यावर ते म्हणाले होते, "पुढची सभा ही फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात (नागपूर) आहे. मला जर बोलायची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन भाषण करणार. तुमची सूचना अजित पवारने स्वीकारली,"

अजितदादांनी कालच्या सभेत भाषण केले नाही, त्यामुळे त्यांनी शब्द पाळला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कालची वज्रमूठ सभा सुरू असताना ‘एकच वादा -अजित दादा’च्या घोषणा व्यासपीठाच्या डाव्या बाजूने येत होत्या.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

अजित दादांनी भाषण करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं असावं, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com