पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत माध्यमांनी अजिबात काळजी करू नये. शिरूरमध्ये लढण्यासाठी अनेकजण इच्छूक असले तर त्यात काय बिघडलं. शिरूरसाठी उद्या अजित पवार इच्छूक असतील तर तुम्हाला काय त्रास आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar's Comment on Shirur Lok Sabha Constituency Candidate)
शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election) लढविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे. तसेच, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही ‘शर्यत अजून संपलेली नाही,’ असे म्हणत आपण अजूनही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले आहे, त्याचबरोबच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय देतील, तो आपल्याला मान्य असेल, असेही म्हटले आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, विलास लांडे हे एकेकाळचे आमचे आमदार आहेत. त्यांना आम्ही महापौर केलं होतं, त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. आता कदचित त्यांनी अधिक जोमाने गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल. त्यामुळे तेही इच्छूक असतील.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, आमचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांचे स्टेटमेंट मी ऐकलं आहे. तो आमच्या घरातील प्रश्न आहे. पक्षांतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाला वाट्याला येतात, हे पहिलं ठरेल. आमच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर आम्ही उमेदवार देऊ. पण, तोडीस तोड उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
शरद पवार जो निर्णय देतील, तो आम्ही मान्य करेन, असे स्वतः अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. मागच्या वेळी अमोल कोल्हे हेच शिरूरसाठी योग्य उमेदवार वाटतात, असे सांगून मी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. त्यानंतर शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आणि त्यांना निवडूनही आणले, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.