Ajit Pawar On By Election Result : पुण्यातील पोटनिवडणूक निकालाबाबत अजितदादांचे सूचक विधान अन्‌ सत्ताधाऱ्यांना दिला इशारा

या पोटनिवडणुकीतील अनेक गुपितं मी निकालानंतर उघड करणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : पुण्यातील (Pune) पोटनिवडणुकीचा (By Election) निकाल लागला ना? तर तुमचं आहे तेपण जाईल. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह सर्वांना तीन-तीन ते चार-चार दिवस बसावं लागलं ना. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. त्या ठिकाणी काय काय घडलं, त्यावर आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या. मग सांगतो की पुणे आणि चिंचवडमध्ये काय घडलं. कुठं काय सापडलं. कोण काय करत होतं. मतदानाला जाऊ नका, म्हणून कोण सांगत होतं. मतदानाला जाणाऱ्यांना कोण काय सांगत होतं, ते सर्व मी उघड करणार आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकीतील गुपित उघड करण्याचा इशारा दिला. (Ajit Pawar's indicative statement regarding by-elections in Pune and warned the ruling party's)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले की, पुण्याचा निकाल दोन तारखेला काय होईल. पुण्याचा निकाल काय लागेल हे मला सांगता येत नाही. मी मतदारांचा आदर करणारा माणूस आहे. पण महाजनांसह अनेक मंत्र्यांना त्या ठिकाणी ठाण मांडावे लागले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बसावं लागलं. या पोटनिवडणुकीतील अनेक गुपितं मी निकालानंतर उघड करणार आहे.

Ajit Pawar
Supreme Court Hearing : ‘तुम्ही शिवसेना आहात की नाही, हे विधीमंडळात ठरू शकत नाही’ : सरन्यायाधीशांचा शिंदे गटाच्या वकिलावर बाउन्सर

शिंदे-फडणवीस सरकारला शिक्षक व पदवीधर निवडणुकीत जबरदस्त चपराक बसली आहे. ते मतदान फक्त एका विभागात झालेले नाही. राज्याच्या सर्वच विभागात ही निवडणूक झालेली आहे. अमरावती विभागात पाच जिल्हे. या विभागातून डॉ. रणजित पाटील निवडून येणार, असे सर्वजण म्हणत होते. पण डॉक्टर कसे पडले, हे कळंलच नाही. डॉ. संजय कुटे यांनाही कळलं नाही. आपले डॉक्टर कसे पडले, यावरून सगळ्यांचं धाबं दणाणले. बोलकिल्ला नागपूरमध्येही आमदार निवडून आला नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून पाठिंबा दिला. पण त्याठिकाणीही पराभव पदरी आला.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत पराभव झाला. खानदेशातही तीच गत. देशात आणि राज्यात सत्ता असतानाही दुसऱ्याच पक्षावर डोळा. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून फोडलेले ३० ते ४० लोक तुमच्याकडे आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी ‘काय पावरा आमच्याकडून तिकडं गेलात ना. का दुसरीकडून कुठून आलात,’ असा सवाल त्यांनी केला.

Ajit Pawar
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीचे राज्यपालांचे ते पत्र रद्दबातल ठरावा; सर्वकाही पूर्ववत होईल : ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद

भाजपने आत्मचिंतन केलं पाहिजे. नाशिक मतदारसंघात आपल्याला उमदेवार देता आलेला नाही. सत्यजित तांबे यांच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्याठिकाणी तांबे यांचा विजय झाला. कोकणातून निवडून आलेले म्हात्रे हे शिवसेनेच्या शिक्षक संघटनेचे प्रमुख होते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय. पण त्या ठिकाणी शेकापच्या बाळाराम पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. भाजपला त्या ठिकाणीही दुसरीकडूनच उमेदवार घ्यावा लागला. खरोखरच सहा महिन्यांत यांनी दिवा लावला असता तर पदवीधर आणि शिक्षकांनी निवडून दिलं असतं. पण लोकांनी या सरकारला नाकारले आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com