Ajit Pawar NCP News : सरकारनामा इम्पॅक्ट - 'दोन महिन्यानंतरही जिल्हाध्यक्ष मिळेना' बातमी झळकली अन् लगेच ते मिळाले!

NCP Pimpri-Chinchwad District President : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी-चिंचवडमध्ये ८० दिवसानंतर जिल्हाध्यक्ष मिळाले, योगेश बहल यांची झाली निवड
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Yogesh Bahl NCP Pimpri-Chinchwad District President :अजित पवार राष्ट्रवादीला दोन महिन्यानंतरही बालेकिल्यात जिल्हाध्यक्ष मिळेना या हेडिंगने सरकारनामाने २९ सप्टेंबरला बातमी दिली.तिची दखल या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली. त्यांनी सोमवारी (ता.७) सांयकाळी योगेश बहल यांच्या नावाची घोषणा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून बारामतीत केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाची अजितदादांनी बारामती येथे सायंकाळी पार्थ पवारांच्याा उपस्थितीत बैठक घेतली. त्याला चिंचवडमधील उमेदवारीसाठी बंडाचा इशारा दिलेले तेथील पक्षाचे माजी नगरसेवकही हजर होते.यावेळी निवडणुकीच्या तोंडावर गेले ८० दिवस शहराध्यक्ष पद रिक्त असल्याचा विषय निघाला.अजितदादांनी(Ajit Pawar) आपल्या स्वभावानुसार लगेच त्यावर निर्णय घेतला.ज्येष्ठ नेते बहल यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली.

Ajit Pawar
Ajit Pawar: बालेकिल्यात अजितदादांना दोन महिन्यानंतरही मिळेना जिल्हाध्यक्ष

पक्षाच्या अडचणीच्या काळात ही जबाबदारी देऊन अजितदादांनी टाकलेला मोठा विश्वास सार्थ करून ठरवेन,अशी प्रतिक्रिया बहल यांनी या घोषणेनंतर सरकारनामाशी बोलताना दिली.विखुरलेल्या पक्षाची मोट बांधणार असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे पद तसेच महापौर,स्थायी समिती अध्यक्षांसारखी इतर पदे पक्षाने यापूर्वीच दिलेली असल्याने आता फक्त उजळणीच करायची आहे,असे ते म्हणाले.ते अजितदादांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

बहलांची दुसऱ्यांदा शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे. सहा वेळा नगरसेवक राहिलेले बहल हे गेल्या टर्ममध्ये सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक होते. १९९२पासून ते सलग या पदी निवडू येत आहेत. महापालिकेच्या सर्व विषय समित्यांचे सभापती नंतर स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर अशी पालिकेतील सर्व पदे त्यांनी भुषविली आहेत.२०१७ ला १५ वर्षाची पालिकेतील पक्षाची सत्ता जाताच नंतर ते विरोधी पक्षनेतेही झाले. गेल्यावर्षी पक्ष फुटल्यानंतर ते अजितदादांसोबत राहिले होते.

Ajit Pawar
Kiren Rijiju News : ''..तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच 'त्यांना' सत्तेत वाटा मिळेल'' ; रिजिजू यांचं पुण्यात वक्तव्य!

पूर्वीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी १६ जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला.तेव्हापासून हे पद रिक्त होते.दुसरीकडे विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बालेकिल्ला असलेल्या शहरातच कॅप्टन नसल्यामुळे ते तातडीने भरण्याची मागणी झाली होती.त्यासाठी बहलांसह ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर,माजी विरोधी पक्षनेते नाना काटे अशी तिघांची नावे चर्चेत होती.हे तिघेहीआमदारकीसाठी इच्छूक असल्याने ते हे पद घेतील की नाही,याविषयी शंका होती.

दरम्यान,भोईर यांनी चिंचवडच्या उमेदवारीसाठी बंडाचा इशारा दिला.काटे हेही तिथे पुन्हा इच्छूक आहेत. तर,बहल सुद्धा विधानपरिषदेसाठी प्रयत्न करीत होते.शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,मयूर कलाटे, यांचीही नावे यासाठी घेतली जात होती.मात्र,या तिघांनी चिंचवडच्या उमेदवारीसाठी बंडाचे हत्यार उपसल्याने त्यांचा पत्ता नंतर कट झाला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com