अजितदादांच्या सोसायटीधारकांच्या संवादावरून भाजप - राष्ट्रवादीत जुंपली...

PCMC : एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला?
VInayak Ransumbhe & Eknath Shinde Latest News
VInayak Ransumbhe & Eknath Shinde Latest NewsSarkarnama

पिंपरी : हौसिंग सोयटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या हेतूने पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसने "संवाद सोसायटीधारकांशी" हा उपक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या (ता.५ ऑक्टोबर) शहरात आयोजित केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपच्या प्रवक्त्यांत जुंपली आहे.

राष्ट्रवादीतील बिल्डर हे सोसायटीधारकांच्या समस्या काय सोडवणार?, अशी विचारणा भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते पिंपरी-चिंचवडकर एकनाथ पवार यांनी काल केली होती. त्यावर सोसायटीधारकांचे प्रश्न राष्ट्रवादीमार्फत सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ उठला असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विनायक रणसुंभे यांनी आज केला. (VInayak Ransumbhe & Eknath Shinde Latest News)

VInayak Ransumbhe & Eknath Shinde Latest News
आढळराव शिंदेंकडे तर कोल्हे शहांकडे : BJP च्या 'अ‍ॅक्शन-मोड' मुळे शिरुरचे राजकारण रंजक...

पिंपरी-चिंचवड शहरात १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीला सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार यांना बोलवावे लागते, हे स्थानिक नेत्यांचे अपयश आहे. ज्या पक्षाचे नगरसेवक बांधकाम व्यावसायिक आहेत, ते हा प्रश्न काय सोडविणार,अशी बोचरी टीका एकनाथ पवार यांनी केली होती. हा उपक्रम हा आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोसायटीधारक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले होते. त्याचा खरपूस समाचार घेताना सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल रणसुभे यांनी केला.

VInayak Ransumbhe & Eknath Shinde Latest News
दसरा मेळावा : बीकेसीत मुख्यमंत्री शिंदेंचे विचार ऐकायला तीन लाखांहून जास्त गर्दी जमेल...

भाजपची केंद्रात 8 वर्ष सत्ता असून राज्यात आणि पिंपरी पालिकेत प्रत्येकी पाच वर्ष सत्ता होती. त्यामुळे सर्वत्र सत्ता भोगलेल्या भाजपवाल्यांनी सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविले नाहीत, म्हणून शहर राष्ट्रवादीला संवाद सोसायटीधारकांशी हा उपक्रम हाती घ्यावा लागल्याचा टोला त्यांनी लगावला. अजित पवार यांच्या माध्यमातून सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे एकनाथ पवारांना दुःख होण्याचे कारण काय? उलट महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात लाचखोरी, खंडणीखोरी, भ्रष्टाचार करून स्वताःची घरे भरणाऱ्या भाजपवाल्यांनी टीका करण्याऐवजी आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. भ्रष्ट कारभार, अंतर्गत कलह, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांशी भाजप नेत्यांचे असलेल्या मधूर संबंधामुळेच सोसायटीधारकांवर आजची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ पवारांनी उत्तर द्यावे

महापालिकेतील गेल्या पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपच्या माध्यमातून आणि आपण पक्षनेता म्हणून शहरातील किती सोसायट्यांचे प्रश्‍न मार्गी लावले. एकनाथराव तुमच्यात हिंमत असेल तर याचे उत्तर द्यावे. ज्यांना जनमाणसात स्थान नाही, ज्यांना जनाधार नाही, एकनाथराव कधी नव्हे ते 2017 ला जनतेतून नगरसेवक झाले. त्यांची आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची वाट बिकट झाल्याने ते बाष्फळ बडबड करत आहेत. त्यामुळे एकनाथरावांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही,असे रणसुभे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com