आढळराव शिंदेंकडे तर कोल्हे शहांकडे : BJP च्या 'अ‍ॅक्शन-मोड' मुळे शिरुरचे राजकारण रंजक...

Shirur : पंतप्रधान मोदींची भेट घेणेही कोल्हेंना शक्य असताना शहांची भेट घेणे, याचे राजकीय अन्वयार्थ नक्कीच निघतात.
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर : भाजपाने राज्यातील १६ लोकसभा मतदार संघावर लोकसभा-२०२४ साठी विशेष लक्ष केंद्रीत करताच शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आपले संपूर्ण राजकीय वजन व क्षमता वापरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेकरवी मतदार संघावर चतुरस्त्र परिणाम करु शकतील,अशी पाच मोठी कामे मंजुर करुन घेवून इतर कामांसाठीचा पाठपूरावा जोरात सुरू केला आहे.

अर्थात आढळरावांनी कामाचा धडाका सुरू करताच दूसरीकडे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kholhe) यांनीही थेट गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेत आपलीही पहुंच कम नसल्याचे दाखवून दिलेय. अर्थात हा मतदार संघ भाजपाने प्रतिष्ठेचा करणे सुरू केल्याने आढळराव-कोल्हे हे दोघेही भाजपाच्या जवळ राहण्याचाच प्रयत्न करीत असल्याचे सकृतदर्शनी तरी दिसून येत असल्याची मतदार संघात चर्चा आहे. (Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News)

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
'हिटलरची स्वतःची मिलिटरी होती तसाच प्रकार ठाण्यात होतोय'

शिवसेनेचा एक गट फोडून राज्याची सत्ता काबीज केल्याने महाराष्ट्र बीजेपी सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. याच अनुषंगाने सध्या बारामती आणि शिरुरमध्ये दोन केंद्रीय मंत्र्याचे दौरे घडवून आणून पुणे जिल्हा भाजपाने नुसता ढवळून काढलाय. आता बारामतीचा विषय आणि तेथील भाजपाचा संभाव्य उमेदवार हा भाजपासाठी अगदी सोपा विषय आहे. मात्र कागदावर नसले तरी तोंडी ३० : ७० च्या फॉर्म्यूल्याने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संमतीशिवाय पूर्णत्वास जाणार नसल्याचे उघड सत्य आहे. याच पार्श्वभूमिवर गुवाहाटी दौ-याआधीपासूनच शिंदे यांच्याशी चांगलेच संपर्कात असलेले आढळरावांनी याच स्नेहाचा उपयोग आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत कामे मंजुर करुन

केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतलेली बैठक ही खास आढळराव यांच्या मागणीपत्रावरुन घेत असल्याचे थेट परिपत्रक काढल्याने मुख्यमंत्र्यांही आढळरावांच्या कपाळाला दोन वर्षे आधीच उमेदवारीचा टिळा लावल्याचा अन्वयार्थ मतदार संघात सध्या तरी काढला जातोय.

मोदींची भेट शक्य असताना अमित शहांची भेट का?

अशा सध्याच्या दूरगामी परिणामकारक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर खरी अडचण झालीय ती विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची. कारण मतदार संघातील कामे करण्यासाठी त्यांचेसोबत ना त्यांच्या विचाराचे राज्य सरकार ना केंद्र सरकार. त्यामुळेच तीन दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट राजकीय उत्सूकतेची ठरलेली आहे. अर्थात शिवप्रताप गरुडझेप या ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने सदर भेट झाल्याचे कोल्हेंकडून स्पष्टीकरण दिले गेले असले तरी देशातील कुणाही नेत्याला भाजपामध्ये प्रवेश करायचा झाल्यास अमित शहांचे महत्व किती मोठे आहे हे संपूर्ण देश जाणतो. त्यातच ऐतिहासिक चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही कोल्हेंना शक्य असताना शहांची भेट कोल्हेंनी घेणे, याचे राजकीय अन्वयार्थ नक्कीच निघतात.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe Latest News
दसरा मेळावा : बीकेसीत मुख्यमंत्री शिंदेंचे विचार ऐकायला तीन लाखांहून जास्त गर्दी जमेल...

त्यातच कोल्हेंचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत येवून लोकसभेत पोहचण्याचा राजकीय प्रवास संपूर्ण मतदार संघ जाणतो. शिवाय शिंदे-फडणवीसांच्या फॉर्म्यूल्यात काही गडबड झाल्यास आणि भाजपाने आढळराव यांचेऐवजी आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास पहिल्या क्रमांकाचा पर्याय शिवसेना-राष्ट्रवादी आणि आता मग भाजपा असा ठरल्यास भाजपाकडून संधी मिळू शकते. याचा अंदाजही कोल्हेंनी घेतला नसेल,असे म्हणणे सध्याच्या गदारोळी राजकीय स्थितीत धाडसाचे ठरेल. पर्यायाने आढळराव शिंदेंकडून शिरुरमधील प्रलंबीत अनेक कामे धडाधडा मंजुर करुन घेत असताना कोल्हेंसाठीची मोकळी राजकीय स्पेस ते शहांना भेटून भरुन काढणार नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल आणि हीच चर्चा सध्या संपूर्ण सहा विधानसभा मतदार संघाच्या शिरुर लोकसभा मतदार संघात सुरू असल्याने शिरुरचे राजकारण रंजक होत चालले आहे.

मतदार संघात फिरणे दोघांसाठीही महत्वाचे..!

लोकसभा निवडणूकीतील पराभवापासून ते अगदी कोवीड काळातही मतदार संघातील संपर्क आढळराव यांनी कमी होवू दिलेला नाही. मतदार संघातील प्रत्येकाचा फोन अटेंड करणे हे आढळराव यांचे बलस्थान. तुलनेत खासादर कोल्हे यांचेकडून तितकासा संपर्क होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. आता लोकसभा निवडणूकीला जेमतेम दोनच वर्षे राहिलेले असताना दोघांसाठीही मतदार संघात जास्तीत जास्त फिरणे वा लोकसंपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यातच भाजपाची भूमिक दोघांसाठीही मौनाची असल्याने आगामी दोन वर्षे दोघांच्या दृष्टीने मोठ्या कसोटीचे असणार हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com