अजित पवारांची मोठी घोषणा : ‘माळेगाव’चा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून असेल!

हे मी कदापीही विसरू शकत नाही
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

माळेगाव (जि. पुणे) : सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची असो अथवा विरोधकांची माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष तावरे आडनावाचाच असतो, या राजकीय समीकरणावर मोठे भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘यापुढे तावरे आडनाव वगळता ‘माळेगाव’चा अध्यक्ष असेल, असे विधान केले. सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी ‘माळेगाव’बाबत भूमिका स्पष्ट केली. त्या विधानाचे पडसाद ‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात उमटले आहेत. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यानंतर माळेगावचे अध्यक्ष कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ संचालक अॅड केशवराव जगताप, संचालक योगेश जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव आदी संचालकांपैकी एकाला अध्यक्षपद मिळू शकते, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत. (Taware will not next president of Malegaon factory : Ajit Pawar)

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक साधारणतः दीड वर्षापूर्वी पार पडली. त्या निवडणूक प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची सत्ता विरोधकांच्या ताब्यातून राष्ट्रवादीकडे खेचून घेतली. त्यानुसार कारखान्याचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी ८ मार्च २०२० पासून अध्यक्षपदी बाळासाहेब तावरे यांना संधी दिली आहे. बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदी सध्याचा व यापूर्वीचा कार्यकाळ विचारात घेता सर्वाधिक १४ वर्षे यशस्वीरित्या काम केल्याची नोंद आहे. त्या खालोखाल पवारांचे विरोधक आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल साडेबारा वर्ष अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर विरोधक संपतराव तावरे, रंजन तावरे यांनी प्रत्येकी पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

Ajit Pawar
पवारच पाठीशी नसल्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली असावी

हाच धागा पकडत पवार यांनी सोमेश्वरच्या शेतकरी मेळाव्यात माळेगावच्या अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे. ‘माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यानंतरचा अध्यक्ष हा तावरे आडनाव सोडून असले, हा माझा शब्द आहे,’ अशी ठोस भूमिका पवार यांनी जाहीर केल्याने साखर पट्ट्यात सर्वांच्याच भूवया उंचाविल्या गेल्या. अजित पवारांनी ही भूमिका का मांडली आणि त्यांचा त्या विधानामागील उद्देश काय आहे, हे मात्र कोणालाच कळेनासा झाला आहे.

Ajit Pawar
नव्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची काही तासांतच सोनियांकडं मागणी

या बाबत कारखान्याचे जाणकरांचे मत असे आहे की, कारखान्याच्या राजकारणात आणि कामकाजात सर्व घटकांना संधी देणे व सक्षम नवीन चेहरे तयार करण्याचा पवार यांचा उद्देश असू शकतो. त्यामध्ये विद्यमान संचालक केशवराव जगताप, योगेश जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव आदींची नावे चर्चिली जाऊ लागली आहेत. केशवराव जगताप यांच्या पाठीशी विविध सहकारी संस्थेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. शिवाय शेतकऱ्यांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. योगेश जगताप यांनी बारामतीचे नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच, त्यांनी साखर धंद्यात अलिकडच्या काळात अभ्यासू ठसा उमटविला आहे. मदनराव देवकाते हे जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही साखर कारखान्यात अनेक वर्ष काम केले आहे. यशस्वी उद्योजक म्हणून सातव यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे.

ते मी कदापि विसरणार नाही : बाळासाहेब तावरे

यासंदर्भात ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवारांनी मला माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी दिली. हे मी कदापीही विसरू शकत नाही. अर्थात संबंधित नेत्यांसह आजी माजी संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे माळेगाव राज्यात अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जोपर्यंत अजितदादा आणि संचालक मंडळ अध्यक्षपदावर मला काम करण्याची संधी देतील तोपर्यंच शेतकऱ्यांचे हित आणि संस्थेची अर्थिक क्षमता मजबूत करण्याकडे मी प्रमाणिकपणे लक्ष देईन.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com