Pavana Water Project : कट्टर विरोधक शेळके, भेगडे मोर्चाच्या नेतृत्वासाठी आले एकत्र; पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन

Maval News : मोर्चा आयोजकांचे मन वळविण्यात आमदार सुनील शेळके हे अपयशी ठरल्याने आज मोर्चा निघाला.
Bala Bhegade-Sunil Shelke
Bala Bhegade-Sunil Shelke Sarkarnama

Pimpri Chinchwad News : मावळमधील पवना धरणातून बंदिस्त वाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहराला पाणी आणण्याच्या योजनेवरील स्थगिती स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही त्यांना न विचारता बारा वर्षानंतर राज्य सरकारने नुकतीच उठवली. त्यामुळे संतप्त झालेल्या मावळवासीयांनी आज (ता. १५ सप्टेंबर) वडगाव येथील तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा नेऊन या निर्णयाचा निषेधच नाही, तर तो रद्द करण्याची मागणी केली. (All party march in Maval against Pavana Pipeline water Project)

अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री भाजपचे बाळा भेगडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं. स्थानिक आमदार (शेळके), खासदार (शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे) यांनी या मोर्चाचे नेतृत्व करावे, असे परवाच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते.

Bala Bhegade-Sunil Shelke
Ajit Pawar Upset On Minister : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष; नाराज अजितदादांनी घेतला मोठा निर्णय...

खासदार बारणे हे आज मोर्चाला आलेच नाहीत. ते येण्याची शक्यता कमी असल्याचे ‘सरकारनामा’ने गुरुवारच्या बातमीत म्हटले होते. ते खरे ठरले. हा प्रकल्प रद्दच करण्याच्या मागणीचे निवेदन यावे ळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची याप्रश्नी भेट घेण्याचे या वेळी ठरल्याचे भेगडे यांनी सांगितले.

पवना प्रकल्पाच्या कामावरील बंदी उठली असली, तरी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे काम सुरु केले जाणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे, त्यामुळे आज मोर्चा न नेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यात समाधान झाले नाही, तर धरणातून पाणी बंद अथवा ‘एक्स्प्रेस वे’ रोखण्यासारखे कडक आंदोलन करू, असे आमदार शेळके यांनी गुरुवारी म्हटले होते. मात्र, मोर्चा आयोजकांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्याने आज मोर्चा निघाला. त्यामुळे त्यांनाही त्यात सामील व्हावे लागले.

Bala Bhegade-Sunil Shelke
Gholap Increased Thackeray Tension : बबनराव घोलपांनी वाढविले ठाकरे गटाचे टेन्शन

पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. त्यात स्थगिती उठविण्याचा निर्णय स्थगित करून हा प्रकल्प येत्या दहा दिवसांत रद्द केला नाही, तर रास्ता रोको आणि रेल रोको सारखे आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

Bala Bhegade-Sunil Shelke
Vikhe Patil CM Post News : विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरातांच्या ‘होमपिच’वर प्रार्थना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com