Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात येऊन उणेपुरे दोन महिने झाले. मात्र, मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याने बैठकीत पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष संघटनेसाठी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्याने बैठकीत नाराजीचा सूर उमटला. त्यातूनच आता मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक काढण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. (NCP ministers' neglect of party organization; Disgruntled Ajitdada took a big decision)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवास स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत मंत्री नेमून दिलेल्या जिल्ह्यांत जात नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटला. मंत्र्यांवर संबंधित जिल्ह्याची जबाबदारी देऊन महिना उलटला, तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्याने संबंधित मंत्र्यांकडून कामकाजाचा अहवाल मागविण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या गटाचे आठ मंत्री सध्या राज्य सरकारमध्ये आहेत. या आठ मंत्र्यांना खात्याचा कार्यभार सांभाळतानाच पक्षवाढीसाठी काही जिल्ह्याची जबाबदारीही देण्यात आली होती. जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांत जाऊन कार्यकर्ता मेळावे घेणे, पक्षाच्या शिबिरांना हजेरी लावणे, पदाधिकऱ्यांच्या बैठका घेणे अशा जबाबदाऱ्या मंत्र्यंना पार पाडाव्या लागणार होत्या. मात्र, बहुतांश मंत्री नेमून दिलेल्या जिल्ह्याकडे फिरकलेही नाहीत, त्यामुळे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्र्यांचे संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याने आता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक काढण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे, त्यामुळे कोणत्या मंत्र्याने काय काम केले आहे, हे त्या प्रगतिपुस्तकावरून कळणार आहे.
कोणत्या मंत्र्यांकडे कोणते जिल्हे आहेत
अजित पवार : पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
प्रफुल पटेल : भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
छगन भुजबळ : नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगरे
दिलीप वळसे पाटील : अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलडाणा
हसन मुश्रीफ : कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नगर
धनंजय मुंडे : बीड, परभणी, नांदेड, व जालना
संजय बनसोडे : हिंगोली, लातूर, धाराशिव
आदिती तटकरे : रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर
अनिल पाटील : जळगाव, धुळे व नंदुरबार
धर्मरावबाबा आत्राम : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.