पिंपरीतील सर्वच भोंगे विनापरवाना तर १४७ धार्मिक स्थळेही अनधिकृत

Pimpri Chinchwad News: एक टक्काच धार्मिक स्थळांनी भोंग्यासाठी परवानगी मागणारे अर्ज पोलिसांकडे केले आहेत.
Loud speakers on religious places
Loud speakers on religious placesSarkarnama

पिंपरी : मशिदींवरील विनापरवानगी भोंग्याचा विषय `मनसे` (MNS) म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हाती घेतल्याने हा `भोंगा`आता देशभर वाजू लागला आहे. त्यातही महाराष्ट्रात त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक नाही, तर ही सामाजिक समस्या असल्याचा राज यांचा दावा आहे. या अनधिकृत भोंग्याच्या विषयाला उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडही (Pimpri-Chinchwad) अपवाद नाही. येथे तब्बल ४५९ भोंगे विविध धार्मिक स्थळांवर असून त्यातील एकालाही पोलिस परवानगी घेण्यात आलेली नाही. शीख धर्मियांच्या गुरुव्दाराचा अपवाद वगळता शहरातील इतर सर्व धार्मिक स्थळी भोंगे आहेत. (Loud speakers on religious places)

Loud speakers on religious places
राज ठाकरे माफी मागा; अन्यथा अयोध्येत घुसू देणार नाही : भाजप खासदाराचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंगेच अनधिकृत नाहीत, तर अनेक धार्मिक स्थळेही अनधिकृतच आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या आकडेवारीने त्याला दुजोरा दिला आहे. सर्वधर्मियांची १ हजार ७ धार्मिक स्थळे शहरात असून त्यापैकी ८६० अधिकृत आहेत. म्हणजे उर्वरित १४७ अनधिकृत आहेत. या धार्मिक स्थळांवर एकूण ४५९ भोंगे असून ते सर्वच्या सर्व विनापरवानगी आहेत, अशी माहिती शहर पोलिसांच्या विशेष शाखेतून आज (ता.5 मे) देण्यात आली.

शहरामध्ये १११ मशिदी असल्या, तरी तेथील भोंग्याची संख्या, मात्र त्यापेक्षा दुप्पट म्हणजे २२४ आहे. या १११ पैकी आठ मशिदी बेकायदेशीर आहेत. त्याजोडीने शहरात चाळीस दर्गे, वीस मदरसे, सहा अंजुमन, ईदगाह सात आहेत. मशिदीच्या जोडीने दर्ग्यात दोन, मदरशात २४, अंजुमनमध्ये ९, तर कब्रस्थानात चार भोंगे आहेत. ६२९ मंदिरापैकी ७० अनधिकृत आहेत. मंदिरातील भोंग्याची संख्या १८० आहे. ११३ बुद्धविहारापैकी ३२ बेकायदेशीर असून फक्त एक भोंगा तेथे आहे. आठ गुरुव्दारांत एक बेकायदेशीर आहे. ६५ पैकी आठ चर्चही अनधिकृत आहेत. फक्त एकाच चर्चमध्ये भोंगा असून तो ही विनापरवानगी आहे.

Loud speakers on religious places
बाळासाहेबांसारखीच व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती, त्यांनी भोंग्याचं राजकारण सुरु केलयं!

भोंग्याचा प्रश्न राज्यभर गाजू लागल्यानंतर शहरातील नऊ मशिदी आणि दोन मंदिरे अशा फक्त ११ म्हणजे एक टक्काच धार्मिक स्थळांनी भोंग्यासाठी परवानगी मागणारे अर्ज पोलिसांकडे केले आहेत. मात्र, अद्याप त्यापैकी एकालाही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती शहर पोलिसांच्या विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी 'सरकारनामा'ला आज दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com