ED Action In Pune : ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सेवाविकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीला 'ईडी' ने घेतले ताब्यात

ED Action In Pimpri-Chinchwad : आरोपींची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता १९ मे रोजी 'ईडी' ने जप्त केली आहे.
ED Action In Pune :
ED Action In Pune :Sarkarnama
Published on
Updated on

ED Action In PCMC : पिंपरी-चिंचवडमधील सेवाविकास कॉ-ऑपरेटीव्ह बॅंकेतील ४२९ कोटी सहा लाख रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी या बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) माजी उपमहापौर अमर मुलचंदांनी यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजे 'ईडी'ने मुंबईत आज (ता.१ जुलै) ताब्यात घेतले. याच प्रकरणात त्यांची आणि इतर आरोपींची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता १९ मे रोजी 'ईडी' ने जप्त केली आहे.

सेवाविकास बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात पोलिसांत २०१९ पासून अनेक गुन्हे दाखल असून त्यात मुलचंदानी यांना अटकही झाली होती. नंतर ते जामीनावर सुटून येताच या प्रकरणात 'ईडी' (ED) ची एंट्री झाली. त्यांनी याप्रकरणी मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यात यावर्षी २७ जानेवारीला मुलचंदांनी यांच्या पिंपरीतील मिस्त्री पॅलेस बंगल्यासह पुण्यात दहा ठिकाणी छापेमारी केली.

ED Action In Pune :
Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाह, फडणवीस अन् शिंदे यांची एकच इच्छा; राऊत स्पष्टच बोलले

त्यात मुलचंदानीच्या घरातून पावणेतीन कोटी रुपयांचे घबाड त्यांच्या हाती लागले होते. त्यावेळी दरवाजा न उघडता ईडीच्या अधिकाऱ्यांना काही तास बाहेर मुलचंदांनी कुटुंबाने ताटकळत ठेवले होते. त्याबद्दल शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवून पिंपरी पोलिसांनी त्यांना व कुटुंबातील सदस्यांनाही अटक केली होती. मात्र, मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने त्यावेळी त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली नव्हती. ती आज केली.

मुलचंदानीहे भाजपाशी (BJP) सबंधित होते. त्यांच्या एका आमदारासह पिंपरी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे मुलचंदांनींशी जवळचे सबंध होते. त्यांच्या कार्यालयात त्यांची नियमित उठबस होती. महाविकास आघाडी सरकार असताना पोलिसांनी गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली होती. त्यानंतर बॅंक डबघाईस आली.

ED Action In Pune :
Eknath Shinde News : शिंदे गटात प्रवेश होताच सुशांत सिंह अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राहुल कनाल म्हणाले...

परिणामी रिझर्व बॅंकेने तिच्यावर प्रशासक नेमला. मात्र, त्याचाही उपयोग न झाल्याने सरतेशेवटी रिझर्व बॅकेने सेवाविकास बॅंकेचा परवानाच गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला रद्द केला. पिंपरींतील सिंधी व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून सेवाविकास बॅंक ओळखली जात होती.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com