Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाह, फडणवीस अन् शिंदे यांची एकच इच्छा; राऊत स्पष्टच बोलले

Shivsena News : मुंबई महानगरपालिका मधील भ्रष्टाचारा विरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray In Mumbai News : मुंबई महानगरपालिका मधील भ्रष्टाचारा विरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज (ता.१) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मग मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा (Shivsena) बाळासाहेबांचा भगवा खाली उतरवण्यासाठी दिल्लीतील दोन बोके आणि महाराष्ट्रातील 40 खोके कारस्थान करत असल्याची टीका जळजळीत टीका त्यांनी केली. शिवसेनेचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी जे काही कारस्थान करत आहेत ते कारस्थान उधळून लावण्यासाठी हा मोर्चा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut News
Eknath Shinde News : शिंदे गटात प्रवेश होताच सुशांत सिंह अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राहुल कनाल म्हणाले...

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ही मुंबई शिवसेनेची आहे. ही मुंबई महानगरपालिकाही शिवसेनेच्या बापाची आहे हे लक्षात ठेवा. गेल्या 30-35 वर्षात शिवसेनेवर भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फडकवत ठेवला. हा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील 40 खोके जे काही कारस्थाने करतायत ती उधळण्यासाठी हा मोर्चा आहे.

या महाराष्ट्रावर आणि मुंबईवर कायम शिवसेनेचेच राज्य राहील हे सांगणारा हा मोर्चा आहे. सध्या महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याविरोधातला हा मोर्चा आहे. शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचे राज्य, नगरसेवकांचे राज्य जोरजबरदस्तीने काढून घेतल्यापासून महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा आहे, असे राऊत यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाची (BJP) खास करून मोदी, शाह, फडणवीस आणि शिंदे यांची एकच इच्छा आहे. भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभीमानाने भ्रष्टाचार करा. शिवसेनेत किंवा काँग्रेस (Congress) पक्षात राहाल तर तुरुंगात जावे लागेल. मात्र, अत्यंत बेधडकपणे आज इथे लाखोंच्या संख्येनं मुंबईकर जमले आहेत. या मुंबईकरांचे एकच सांगणे आहे निवडणुका घ्या. निवडणुका घ्या असे आव्हान राऊत यांनी दिले.

Sanjay Raut News
PCMC News : प्रकल्प सिद्धीमुळे पिंपरी महापालिकेच्या उत्पन्नात झाली कोट्यवधींची वृध्दी

मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवला आहे. हा भगवा खाली उतरवण्याचे काम केंद्रातील भाजपा आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार करत आहे. आज मोर्चात उपस्थित असलेले शिवसैनिक पाहून मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातच भगवा पुन्हा फडकेल, असा विश्वास वाटत असल्याचे राऊत म्हटले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com