Eknath Shinde ON Amit Shah : सहकार क्षेत्रासाठी शाहचं नेतृत्व म्हणजे वरदान ; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Pune News : शहांना मी कधीही थकलेले पाहिले नाही. ते नेहमीच उत्साही असतात.
Amit Shah ,  Eknath Shinde
Amit Shah , Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune : केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS)कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते चिंचवड येथे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्या कामाचे कौतुक केलं. "शहा यांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र दिला. सहकार क्षेत्रासाठी शहाचं नेतृत्व म्हणजे वरदान आहे, " असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"अमित शाह यांनी एकदा निर्णय घेतला की ते थांबत नाहीत. त्यांनी या क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल केले आहेत. सहकारमंत्री झाल्यानंतर शहा यांनी अनेक क्रांतीक्रारी निर्णय घेतले. त्यांच्यामुळे सहकार क्षेत्राला नवी उर्जा मिळाली आहे. ते देशहिताचा निर्णय घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी मी पाहिली नाही.शहांना मी कधीही थकलेले पाहिले नाही. ते नेहमीच उत्साही असतात. त्यांची भूमिका नेहमीच मदतीची असते," असे शिंदे म्हणाले.

Amit Shah ,  Eknath Shinde
Amit Shah on Ajit Pawar : अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात ; शहा यांचे मोठे विधान

"सहकार क्षेत्रात हुकुमशाही प्रवृत्ती होती. शाह यांनी ही प्रवृत्ती मोडून काढली. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. राज्यातील साखर उद्योगाला केंद्राने मोठी मदत केली आहे. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. सहकार क्षेत्राचा कर माफ करून त्यांनी या क्षेत्राला नवसंजीवनी दिली, " असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमानंतर पुण्यातील बुथ कमिटी सदस्य आणि काही नेत्यांची भेटीसाठी वेळ राखून ठेवला होता, पण आता यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शहा हे चिंचवडच्या कार्यक्रमानंतर ते मुक्कामास असलेल्या पुण्यातील हॉटेलात जाणार असून तेथून ते दिल्लीला रवाना होणार आहेत. देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत.त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com