Amit Shah News : तीन निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अहंकार वाढला; शहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

Amit Shah Pune visit : पुण्यात प्रदेश भाजपचे अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi, Amit shahSarkarnama
Published on
Updated on

BJP state conclave in Pune : पुण्यात प्रदेश भाजपच्या अधिवेशनाप्रसंगी भाषणाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी दोन मुलांच्या परीक्षेचे उदाहरण देत काँग्रेसच्या कामगिरीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढताना जोरदार टीका केली.

पुण्यात प्रदेश भाजपचे (Bjp)अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करत भाषणाला सुरुवात केली. गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

त्यांनतर भाषणाच्या पहिल्या 5 मिनिटांतच अमित शहांनी राहुल गांधीवर जोरदार टीका करीत ठोकून काढले. आतापर्यंत निवडणूका जिंकल्यानंतर काही जणांना अहंकारी होत असल्याचे पहिले आहे. मात्र, राहुल गांधींचा (Rahul Gandhi) अहंकार तीन निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर वाढला असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? हे काँग्रेस विसरली आहे. राहुल गांधी निवडणूक हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या 240 जागा आल्यात, यांचे सर्वाच्या मिळून पण आल्या नाहीत, हे विसरले असल्याची टीका यावेळी शाह यांनी केली.

Rahul Gandhi, Amit shah
Video Devendra Fadnavis : आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा; देवेंद्र फडणवीसांचे फर्मान

पुण्यात अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी शाह म्हणाले, लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

नेतृत्वाबाबत अमित शाह यांनी बोलून मुख्यमंत्री पद हे भाजपकडे असण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. मला आज कार्यकर्ते भेटत आहेत. मी त्यांच्याशी बोललो पण कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत. भ्रम पसरवण्याचे काम विरोधकांनी केले आहे, असे अमित शाह म्हणाले.

Rahul Gandhi, Amit shah
BJP Pune Convention : 'चिंतन' अधिवेशन की विधानसभा निवडणुकीची 'चिंता'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com