Amit Shah News : राज्याच्या सहकार क्षेत्रात अमित शाहांचे दमदार पाऊल; 'पॅक्स'ची संख्या दुप्पट करणार

State Co-Operative : केंद्राकडून राज्यात सहकार विकास समित्यांची स्थापना
Amit Shah
Amit ShahSarkarnama

BJP Politics : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी संस्था सक्षम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार विकास समित्यांची स्थापना केली आहे.

या समित्यांवर प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे या समित्यांच्या माध्यमातून भाजप आता सहकार क्षेत्रात मजबूत पकड निर्माण करीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Amit Shah
Tamilnadu Politics : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन कुटुंबाकडे तब्बल 1.34 लाख कोटींची मालमत्ता?; यंत्रणांची पडणार वक्र नजर !

केंद्र सरकारने (Central Govt) सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना (पॅक्स) सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ज्या गावात सहकारी संस्था अस्तित्वात नाहीत, तेथे नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था किंवा दुग्ध, मत्स्यव्यवसाय संस्था स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये राज्य आणि जिल्हास्तरावर जिल्हा सहकार विकास समित्या स्थापन केल्या आहेत.

Amit Shah
Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

केंद्राच्या निर्णयानुसार देशात पुढील पाच वर्षांत दोन लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करणे, त्रिस्तरीय रचनेनुसार प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा जिल्हा आणि राज्य बँक यांच्याशी समन्वय राखून संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे भाजप (BJP) राज्यातील सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

Amit Shah
Mahadev Jankar fight Baramati Loksabha : महादेव जानकर पुन्हा उतरणार बारामतीच्या मैदानात; भाजपच्या अडचणी वाढल्या

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहकार विकास समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यपदी राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच इतर सदस्यांमध्ये सहकार व पणन, कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त किंवा प्रधान सचिव, तसेच सहकार आयुक्त, नाबार्ड, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, मत्स्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी असणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com