Amol Kolhe News : फडणवीसांचं भाषण कानावर पडण्याआधीच अमोल कोल्हे, अशोकबापूंनी घेतला काढता पाय

Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन
Ashok Pawar, Amol Kolhe
Ashok Pawar, Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात विरोधतातील खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि आमदार अशोक पवारांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असतानाच कोल्हे आणि पवारांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला. आपल्याच होमपीचवर कोल्हेंच्या रंगलेल्या नाराजीनाट्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. (Amol Kolhe News )

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. त्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या हस्ते झाले. दरम्यान, कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यावर फक्त नेत्यांचेच फोटो होते. पक्षांचेच झेंडे झळकत होते. मात्र, संभाजीराजेंचा फोटो गायब होता. यातूनच नाराज खासदार कोल्हे आणि आमदार पवार यांनी भर कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Pawar, Amol Kolhe
BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

खासदार अमोल कोल्हे यांनी या बॅनरबाजीवर नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी मला ऐनवेळी रात्री निमंत्रण मिळालेले होते. मात्र, ज्यांच्या समाधी स्थळाचे भूमिपूजन आहे, त्या छत्रपती संभाजीराजेंनाच बॅनर्सवर स्थान देलेले नाही. त्यावर फक्त राजकीय नेत्यांचेच फोटो झळकत आहेत. परिसरात राजकीय झेंडे दिसून येत आहेत. कार्यक्रमात धाकल्या धन्याच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोपही कोल्हेंनी केला.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचार जिवंत राहतील. अजित पवार सुरुवातीस आमच्या सोबत नव्हते, त्यावेळी हा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी आता अजितदादा आमच्या सोबत आहेत. दादा मी नेहमी उचित सल्ला देतो, जे एकतात त्यांचे कल्याण होते, असे सूचक विधानही फडणवीसांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Pawar, Amol Kolhe
Anil Desai News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाईंना बजावले समन्स; 'हे' आहे कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com