Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी मतदारांशी महागद्दारी केली; शिरूरमध्ये महायुती आक्रमक

Shirur Lok Sabha Election : गतवेळी निवडून आल्यानंतर अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही, हाच मुद्दा उचलून धरत शिवाजीराव आढळराव यांनी शिरूरमध्ये राळ उठवली आहे.
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Shirur Political News : 2019 ला खासदार झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे साडेचार वर्षे मतदारसंघात फिरकले नाहीत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीतील घटक पक्षांनी केला. आता हा मुद्द्याचा कोल्हेंविरोधात शस्त्राप्रमाणे वापर केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी शिरूर Shirur लोकसभेतील आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना आता २०२४ च्या निवडणुकीत अडचणीचा ठरतो आहे. रासे (ता. खेड) येथे त्यांच्याविरुद्ध उपरोधिक बॅनर लागल्यानंतर करंदी (ता. शिरूर) येथे `आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले`, अशी थेट विचारणाच त्यांना झाली. त्यानंतर आता पाईट (ता. खेड) येथे याच मुद्द्याने त्यांना पुन्हा अडचणीत आणले.

भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये सामील झाल्याने कोल्हे यांनी अजित पवारांसह Ajit Pawar त्यांच्या समर्थकांचा महागद्दार असा उल्लेख केला होता. यावर उत्तर देताना अजित पवार गटाने कोल्हेंवर पलटवार केला. निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरता मतदारांशी गद्दारी केली आहे, असा हल्लाबोल भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी पाईट येथे केला. आढळराव-पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शेकडो पत्रे दिली, फोन केले, पण ते उचलले नाहीत. त्यामुळे कामे झाली नसल्याची अनेक गावात कोल्हेंविरोधात तक्रार आहे, असे ते म्हणाले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्ग चक्रीवादळ झाले, तेव्हाही ते फिरकले नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. निवडून दिलेला सरंपच पाच वर्षे भेटला नाही, तर त्याला आपण घरी पाठवतो. आता मतदारांशी प्रतारणा करणाऱ्या खासदार कोल्हेंच्या Amol Kolhe मागे उभे राहणार का, अशी विचारणा त्यांनी केली. दुसरीकडे खासदार नसताना खासदारकीची कामे करणाऱ्या व चक्रीवादळात मदतीचे साहित्य घेऊन धावलेले आढळराव यांच्यामागे उभे राहण्याचे आवाहन बुट्टेंनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Supriya Sule Debt : सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रावहिनींचं 55 लाख रुपयांचं कर्ज

एकूणच मतदारसंघात फिरले नसल्याचा कळीचा मुद्दा कोल्हेंची पाठ सोडायला तयार नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) शिवाजीराव आढळराव-पाटील Shivajirao Adhalrao आपल्या प्रचारात त्यावरच भर देत आहेत. त्यानंतर महायुतीतील मित्रपक्ष भाजपनेही आता तो उचलून धरला आहे. गावोगावी त्यांना त्याबद्दल विचारणाही होत आहे. रासे गावात ती अमोलदादा, तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत! असे उपरोधिक बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर करंदीत ते प्रचाराला गेले असता तेथील ग्रामस्थाने कोल्हेंना आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा थेट व्यासपीठावरच विचारणा केली. त्यानंतर पाईटमध्ये भाजपने याच मुद्द्यावरून त्यांना आपल्या रडारवर घेतले.

(Edited by Sunil Dhumal)

  • R

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Nanded Politics : मराठा समाज आक्रमक; थेट अशोक चव्हाणांचे भाषणच थांबवले, नांदेडमध्ये नेमके काय झाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com