Shrirang Barne Vs Sanjog Waghere: मावळाचा शिलेदार बाण उचलणारा की मशाल पेटवणारा?

Maval Lok Sabha Election Result: मावळच्या उमेदवारांचं भवितव्य सध्या ईव्हीएममध्ये बंद आहे. ईव्हीएममधील मतदानाची मोजणी 4 जूनला सकाळपासून सुरु होईल आणि दुपारपर्यंत मावळच्या जनतेने कोणाच्या गळ्यात खासदारकीची 'माळ' घातली हे स्पष्ट होणार आहे.
Shrirang Barne , Sanjog Waghere
Shrirang Barne , Sanjog WaghereSarkarnama

Maval Lok Sabha Election Result, 31 May: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला सलाम ठोकणाऱ्या श्रीरंग बारणेंना धडा शिकविण्याच्या हेतुने ठाकरेंनी मावळात डाव टाकला. बारणेंना जशास तसे म्हणजे, विरोधात मनी, मसल पॉवर दाखविण्याऐवजी ठाकरेंनी 'इमोशनल' कार्ड काढून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरेंना मैदानात उतरवून मावळचा गड पुन्हा खेचून आणण्यासाठी झुंजवले.

पहिल्या एक-दोन टप्प्यांत मावळात बारणेंचे (Shrirang Barne) तगडे आव्हान असल्याचे चित्र दिसले, पण हेच चित्र पालटवण्यासाठी वाघेरेंनी अख्खे मावळ म्हणजे, पिपंरीपासून कोकणापर्यंत जाऊन मतदारसंघ पालथा घातला. या दोघांमधील लढतीने रंगत आणली; पण मावळचा शिलेदार कोण? हे निकालादिवशी म्हणजे, 4 जूनला कळेल. यासाटी सकाळी 11 वाजेपर्यंत मतमोजणीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यानंतर म्हणजे, दुपारी 1 वाजेच्या सुमारास मावळात बाण की मशाल हेही स्पष्ट होईल. त्यामुळे आता मतदारांसह उमेदवारांना केवळ 4 जूनच्या निकालाची उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मावळ' मतदारसंघ (Maval Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. मावळ हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला इथे शिवसेनेसमोर खुद्द अजित पवारांच्या मुलाचादेखील पराभव झाला होता. त्यामुळे मावळ आणि शिवसेना हेच समीकरण पहिल्यापासून पाहायला मिळते. तर या लोकसभेत देखील हेच चित्र दिसले. कारण या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचेच होते. फरक एवढाचं की एक ठाकरेंच्या शिवसेनेचा तर दुसरा शिंदेंच्या सेनेचा.

मावळ मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून युतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. कारण विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिंदेंच्या सेनेकडून उमेदवारी मिळाली असली तरी त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा? अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) काही नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीत असणाऱ्या तीन पक्षांचं एकमत करण्याचं अवघड काम नेत्यांसमोर होतं. काहीही मतभेद असले तरी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि 'अब की पार चारसो पार'चा नारा खरा करण्यासाठी आपणाला युतीधर्म पाळावा लागेल. अशा सूचना अजितदादांनी आपल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

Shrirang Barne , Sanjog Waghere
Lok Sabha Election 2024 Result : वेळ ठरली! बारामती, पुणे, शिरूर अन् मावळात कुणाचं वर्चस्व.. दुपारपर्यंतच होणार स्पष्ट

शिवाय अनेकांना अनेक आश्वासनं देऊन अखेर या मतदारसंघात शिंदेसेनेकडून उभं असणाऱ्या बारणेंचा प्रचार करण्यावर युतीतील मित्र पक्षांचं एकमत झालं. बारणेंच्या मागे महायुतीची मोठी ताकद असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बारणेंना सोपी जाईल असं चित्र होतं. मात्र, मावळचा गड ठाकरेंच्या उमेदवारांनेदेखील शेवटपर्यंत चांगलाच लढवला. शिंदेंच्या उमेदवाराला गद्दार म्हणत संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहानभुतीचा वापर करुन घेतला. मावळात शरद पवारांना मानणारा मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोणाचं पारडं वरचढ ठरणार हे सांगणं कठीण आहे.

या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार यशस्वीपणे पार पडलं. इथे सरासरी 52.90 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता सर्वांना केवळ चार जूनची प्रतिक्षा असून या उमेदवारांचं भवितव्य सध्या ईव्हीएममध्ये बंद आहे. याच ईव्हीएममधील मतदानाची मोजणी 4 जूनला सकाळपासून सुरु होईल तर दुपारपर्यंत मावळच्या जनतेने कोणाच्या गळ्यात खासदारकीची 'माळ' घातली हे स्पष्ट होईल.

Shrirang Barne , Sanjog Waghere
Chhagan Bhujbal On BJP: मी बोलणारच...; विधानसभा जागावाटपावरून भुजबळांनी भाजप नेत्यांना घेतलं शिंगावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com