Amruta Fadnavis: 'पुणे देवेंद्रजींचं बेबी...!'; असं का म्हणाल्या मिसेस मुख्यमंत्री?

Devendra Fadnavis News : 'सामान्य माणूस जोपर्यंत सुखद आयुष्य जगत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे पुण्यामधील त्यांच्या फेऱ्यात कमी करतील असं मला वाटत नसल्याचंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
Devendra Fadnavis And Amruta Fadnavis .jpg
Devendra Fadnavis And Amruta Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस या पुण्यामध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पुणे हे फडणवीस यांचं बेबी असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये भाषण करताना फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल नऊवेळा आपण पुण्याचा दौरा केला. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या असून आपलं पुण्यावर विशेष लक्ष असल्याचं या बातम्यांमध्ये उल्लेख असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यावर विशेष प्रेम आणि लक्ष का आहे?. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे पुणे हे देवेंद्र फडणवीस यांचं एक बेबी आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही आपलीच मुलं आहेत, असं विचार करून देवेंद्र फडणवीस चालतात.

पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत. झपाट्याने शहरीकरण झाल्याने अनेक समस्यांकडे लक्ष गेलं नाही. मला देखील अनेकदा वाटतं की, रस्ते अजून छान झाले पाहिजेत. वाहतूक अधिक सुरळीत झाली पाहिजे. मेट्रोमुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये फरक पडला असून आणखी एक मेट्रो मार्ग तयार होणार असून त्यामुळे देखील पुणेकरांना फायदा होणार आहे.

Devendra Fadnavis And Amruta Fadnavis .jpg
Municipal Elections : तयार राहा! अजित पवारांनी सांगून टाकलं महापालिका निवडणुका कधी होणार, दोन टप्प्यात जिल्हा परिषद अन्...

त्यामुळे सामान्य माणूस जोपर्यंत सुखद आयुष्य जगत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे पुण्यामधील त्यांच्या फेऱ्यात कमी करतील असं मला वाटत नसल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com