Anganwadi Sevika : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी; अंगणवाडी सेविकांचे 14 आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

Anganwadi Workers : एकाच वेळी 14 आमदारांच्या कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांची निदर्शने, बेमुदत उपोषणाचा इशारा दिला
Anganwadi Sevika
Anganwadi Sevika Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं 4 डिसेंबर 2023 पासून आंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे. सोमवारी (ता. 22) त्याला पन्नास दिवस झाले. त्यानिमित्त त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील तीन, मावळातील एक आणि पुणे शहरातील नऊ आणि पुरंदर अशा 14 आमदारांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी हे इशारा आंदोलन आज (ता. 23) दोन तास केले.

आठवडाभरात मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर या आमदारांच्या कार्यालयाबाहेरच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आंगणवाडी सेविकांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी, चिंचवडच्या अश्विनी जगताप यांच्या पिंपळे गुरव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) पिंपरीचे अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डी, तर मावळचे सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी हे इशारा आंदोलन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anganwadi Sevika
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत 'वंचित'च्या प्रवेशाचं घोडं कुठं अडलंय? काँग्रेसनं स्पष्टच सांगितलं

पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), चेतन तुपे (हडपसर), माधुरी मिसाळ (पर्वती), चंद्रकांत पाटील (कोथरुड), रवींद्र धंगेकर (कसबा), सुनील कांबळे (कॅन्टोन्मेंट), भीमराव तापकीर (खडकवासला), सुनील टिंगरे (वडगाव शेरी) आणि संजय जगताप (पुरंदर) यांच्या कार्यालयासमोर ते केले गेले. त्यावेळी बहुतांश आमदार तेथे नव्हते.

त्यामुळे त्यांच्या कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. मात्र, आठवडाभरात मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर या आमदारांच्या कार्यालयाबाहेरच बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिला आहे.

मानधनवाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅच्युइटी, पेन्शन, कामकाजासाठी नवीन मोबाईल/टॅब आदी मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविकांचं हे बंद आंदोलन विविध सनदशीर मार्गाने सुरू आहे. मात्र, त्याला राज्य सरकारने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते आणि चालते त्या आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

सोमवारीच आंदोलन करण्यात येणार होते. पण, अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण विचारात घेऊन आयोजकांनी ते आज केले. दुसरीकडे या अंगणवाडी बंद आंदोलनामुळे गेल्या 50 दिवसांपासून राज्यातील वाडीवस्ती गावपाड्यामधील गरीब घटकातील 70 लाख चिमुकले पोषण आहारापासून आणि पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित आहेत. प्रत्येक आमदाराच्या कार्यालयाबाहेर शंभरावर अंगणवाडीताई सामील झाल्या होत्या.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Anganwadi Sevika
Manoj Jarage Patil : वॅक्स म्युझियममध्ये अवतरले खुद्द जरांगे-पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com