Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत 'वंचित'च्या प्रवेशाचं घोडं कुठं अडलंय? काँग्रेसनं स्पष्टच सांगितलं

Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्रपक्ष एकत्रित लढण्याचे निश्चित
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घ्यायचे की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गट वंचितला आघाडीत घेण्यासाठी आग्रही आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचितमध्ये अद्यापही चर्चांचा खल सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस अद्यापही वंचितबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एक मोठे विधान केले आहे.

पुण्यात काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. या बैठकीदरम्यान रमेश चेन्नीथलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चेन्नीथला म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्रपक्ष एकत्रित लढण्याचे निश्चित झाले आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे, तर आठवडाभरात अंतिम निर्णय कळवण्यात येणार,' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Prakash Ambedkar
Sanjay Bansode : संजय बनसोडे-संभाजी पाटलांत सौख्य वाढले; लातूरचे राजकीय गणित बदलणार?

'महाविकास आघाडीमध्ये (Prakash ambedkar) प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे चर्चा करीत आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, तर आंबेडकरांना आघाडीत समावेश करून घेण्यासाठी काँग्रेसही सकारात्मक आहे. प्राथमिक चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णयही घेण्यात येईल. त्यानंतर आंबेडकर आणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवतील,' असे चेन्नीथलांनी सांगितले.

Prakash Ambedkar
Eknath Shinde : लग्न एकाशी, संसार दुसऱ्याशी, हनिमून...; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

दरम्यान, महाविकास आघाडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे वंचितला इंडिया आघाडीत घेणे आवश्यक आहे, असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या किती जागा द्यायच्या, यावर अजूनही महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे आघाडीत वंचितला सामावून घेण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, प्रकाश आंबेडकरांनी आपली अस्वस्थता अमरावतीत जाहीरपणे बोलून दाखवली आहे. भाजपपेक्षा, काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करीत आंबडेकरांनी थेट स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. सोबत काँग्रेसचा (Congress) प्रभावशाली ताकद असलेल्या अमरावती जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जागावाटपाचा कोणता फाॅर्म्युला घेऊन येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठारणार आहे. तसेच त्या फाॅर्म्युल्यावर आंबेडकरांचे समाधान होणार की नाही, हेही पाहावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Prakash Ambedkar
Dharashiva : पारधी समाजात उजाडतेय 'नवी पहाट'; 'गुन्हेगारी जमात' शिक्का पुसणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com