अंकिता पाटील-ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

अंकिता यांचे वडिल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही ३० डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली आहे
Ankita Patil-Thackeray

Ankita Patil-Thackeray

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे (bjp) नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यापाठोपाठ त्यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे ((Ankita Patil-Thackeray) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (Ankita Patil-Thackeray's corona test positive)

अंकिता पाटील-ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

Ankita Patil-Thackeray

आदित्यने माझा ताण हलका केला : उद्धव ठाकरे

पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी २८ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. थकवा जाणवू लागल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ankita Patil-Thackeray

काँग्रेस उमेदवाराच्या गाडीतील पैशांवर पोलिसांनीच मारला डल्ला : PSIसह चौघे निलंबित

दरम्यान, राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुण्यात शनिवारी (ता. १ जानेवारी) बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० मंत्री आणि २५ आमदारांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यातील पाच नावे कळाली असून इतर नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही शनिवारी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यांना ओमिक्राॅमची लक्षणे दिसू येत आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील घरीच उपचार सुरू आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Ankita Patil-Thackeray

दिलीप मोहितेंच्या मंत्रिपदाच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली!

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार मंत्री वर्षा गायकवाड, के. सी. पडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सागर मेघे, शेखर निकम, इंद्रनील नाईक, चंद्रकांत पाटील (जळगाव), माधुरी मिसाळ माजी आमदार दीपक सावंत, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाने गाठले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com