ACB Raid Pune : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागण्याऱ्या दोघा मदतनीसांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. मंगळवारी वाघोली येथे ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संजय मारूती लाड (वय ५३, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे)आणि भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची दोघा मदतनीसांचे नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी लाच मागितल्याचे आढळले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी पटांगे यांच्याकडून काम करून देण्यासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या दोघांना अटक केली.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.