APMC Election : बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर, १८ उमेदवारांचे ठरणारं भविष्य

निवडणुकीतील 18 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे हवेली तालुक्यातील आहेत.
APMC Election  news Update
APMC Election news Update Sarkarnama

APMC Election : चोवीस वर्षांनंतर कृषी उत्त्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली आहे. 18 जागांसाठी 17 हजार419 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर दोन व्यापारी प्रतिनिधी निवडीसाठी 13 हजार 173 जण मतदान करणार आहेत.

तर जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप नोंदविण्याची 1 मार्च 2023 ही अंतिम तारीख असणार आहे. यावर 10 मार्च पर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 15 मार्च 2023 ला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. 29 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 30 एप्रिलला मतमोजणी होईल. अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली आहे.

APMC Election  news Update
Politics : निधी वाटपावरुन भाजप-शिंदे गटात धूसफूस,मंत्री सावंतांविरोधात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

निवडणुकीतील 18 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे हवेली तालुक्यातील आहेत. विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांमधून या 18 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी134 सोसायट्यांचे एक हजार 655 सदस्य मतदान करतील. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून चार उमेदवारांची निवड केली जाईल. हवेली तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींचे 713 त्यासाठी मतदान करतील. एक हमाल प्रतिनिधी, दोन व्यापारी प्रतिनिधी, तोलणार प्रतिनिधी असतील.

यात व्यापारी प्रतिनिधींसाठी 13 हजार मतदान हक्क बजावतील, तर, हमाल प्रतिनिधींसाठी एक हजार 549 हमाल आणि तोलणार प्रतिनिधींसाठी 329 तोलणार मतदारन करतील. असंही गरड यांनी सांगितलं.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी - २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३

अर्जांची छाननी- ५ एप्रिल २०२३

अर्ज मागे घेण्याचा कालावधी- ६ एप्रिल २० एप्रिल २०२३

अंतिम यादी आणि चिन्ह वाटपाची तारीख - २१ एप्रिल २०२३

मतदानाची तारीख- २९ एप्रिल २०२३

मतमोजणी- ३० एप्रिल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com