
Baramati, 01 December : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत त्यांचे पुतणे तथा विरोधातील उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतमोजणीच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात युगेंद्र पवार यांच्यासह तब्बल ११ उमेदवारांनी मतमोजणीच्या पडताळणीची मागणी केली आहे. आतापर्यंत ११ उमेदवारांनी ६६ लाख ६० हजार रुपये एकत्रितपणे भरले आहेत.
बारामतीत (Baramati) अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यांमध्ये लढाई झाली. त्यात अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. मात्र, अजित पवार यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत युगेंद्र पवार यांनीही मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. युगेंद्र पवार यांचा मतमोजणीवर आक्षेप आहे, त्यामुळे त्यांनी मतमोजणीची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे.
याबाबत युगेंद्र पवार (Yugendra Pawar) म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील एकूण ११ उमेदवारांनी मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला पाच टक्के ईव्हीएमची तपासणी करता येते, त्यानुसार आम्ही मतमोजणीच्या पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.
केवळ बारामतीतच नाही; तर संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे, त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि लिगल टीमशी चर्चा केल्यानंतर आम्हाला वाटलं की आपणही मतमोजणीची पडताळणी केली पाहिजे, असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले
बारामती मतदारसंघातील काही गावांत आम्हाला शंभर टक्के जास्त मते पडायला हवी होती. पण, तशी काही मते पडल्याचे दिसून आलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अधिकार दिलेला असेल तर पडताळणी करून घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला.
युगेंद्र पवार म्हणाले, ईव्हीएम संदर्भात महाराष्ट्रात सध्या जे संशयाचे वातावरण आहे, त्यामुळे मतमोजणीची पडताळणी झालीच पाहिजे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे बोलत आहेत, त्याच्याशी मी सहमत आहे. बारामतीपुरतं बोलायचं झालं तर इथंही संशयाचे वातावरण आहे. बारामतीत मी एक आभार दौरा काढला आहे. मी लोकांना भेटतोय. लोकसभेसारखंच वातावरण विधानसभेलाही होतं. पण, एवढं चित्र कसं बदललं, हेच आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.