Daund Bazar Samiti Result: विरोधकांचा अहंकार पराभूत झाला: आमदार राहुल कुल यांची बोचरी टीका

Daund Politics| बाजार समिती यापूर्वी फक्त राजकारणासाठी वापरली गेली. इथे फक्त ठराविक लोकांचेच तेथे प्राबल्य होते.
Rahul kul
Rahul kulSarkarnama
Published on
Updated on

Daund Bazar Samiti Election Result : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील जागा चारशे मतांच्या फरकाने जिंकण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांचा अहंकार मतदारांनी पराभूत केला. निम्म्या जागा जिंकल्या तरी आम्ही जल्लोष करत आहोत. पण निकालानंतर विरोधकांना तोंड लपवावे लागले, अशी बोचरी टिका दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी केली आहे. (Arrogance of opposition defeated: MLA Rahul Kul's criticism)

दौंड तालुका बाजार समितीचा (Daund Bazar Samiti Election Result) निकाल लागल्यानंतर राहुल कुल यांनी विरोधकांवर ही टीका केली .भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक नंदकुमार पवार यांच्यासह नामदेव बारवकर, महेश भागवत, उपस्थित होते. राहुल कुल म्हणाले, ''दौंड बाजार समिती ही आपलीच प्रॉपर्टी समजून विरोधक निवडणूक लढवत होते. पण मतदारांनी भाजप पुरस्कृत पॅनेलला १८ पैकी ०९ जागा देत त्यांचा हा भ्रम दुर केला. बाजार समिती यापूर्वी फक्त राजकारणासाठी वापरली गेली. इथे फक्त ठराविक लोकांचेच तेथे प्राबल्य होते. पण या निवडणुकीत मतदारांनी बदलाच्या दिशेने कौल दिला.''

Rahul kul
PM Modi's Advertising Expenditure: पंतप्रधानांचा स्वत:च्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च? ठाकरे गटाच्या नेत्याने थेट आकडेवारीच जाहीर केली, पाहा व्हिडीओ...

विरोधकांच्या ताब्यातील दौंड खरेदी विक्री संघातील गैरव्यवहार आणि बाजार समितीमधील कारभार कशा पध्दतीने सुरू होता, हे मतदारांना चांगलंच माहित आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ठेकेदारांच्या नावाखाली विरोधकांनी काय हैदोस घातला, हेही जनतेला माहित आहे. पण आता आम्ही बाजार समिती गतिमान करू. असुविधा दूर करून ग्राहक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राहुल कुल यांनी यावेळी दिली. '' (Pune Bazar Samiti Election result)

दौंड बाजार समिती निवडणुकीच्या दोन दिवस आधी विरोधकांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर आरोप करण्यासाठी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना वरवंड येथे सभेसाठी बोलविले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व संजय राऊत करीत असल्याचे चित्र दिसले. स्वत : वर विश्वास नसल्याने विरोधकांना बाहेरची कुमुक मागवावी लागते. आम्ही सक्षम असल्याने व सर्वसामान्य जनतेवर अवलंबून असल्याचा दावा आमदार राहुल कुल यांनी केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com