Kasba By Election : कसबा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतदारांचे मतदार यादीत फोटोच नाहीत

Pune News : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीची प्रचाराची रणधुमाळी
Voting
Voting Sarkarnama

Kasba By Election : सध्या कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. असे असतानाच आता कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तब्बल 15 हजार 914 असल्याची माहिती समोर आली आहे.

या मतदारांच्या नावे बोगस मतदान होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. फोटो नसलेल्या मतदारांच्या संख्येच्या आकडेवारीची माहिती ही 'पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो'ने त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे.

Voting
Satara : सुडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलखोल करणार : शशिकांत शिंदे संतापले

त्यानुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदारसंख्या ही कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ही तब्बल 2 लाख 75 हजार 428 इतकी आहे. तसेच 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार तर 1 लाख 38 हजार 550 स्त्री मतदार आणि 5 तृतीयपंथी मतदाराची संख्या आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत मात्र, 15 हजार 255 ची घट झाली आहे. तसेच या मतदार यादीत 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 19 हजार एवढी आहे. तर जेष्ठ मतदारांना पोस्टल टपाली मतदानाचा अधिकार आहे. मात्र, यासाठी अत्यल्प प्रतिसाद प्रशासनाला मिळाल्यामुळे मतदानाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

Voting
Brahmin Community : कसब्यात ब्राह्मण समाजाचा मेळावा; ठिकाणे दोन, वेळ एकच, नेमकं जायचं कुठे ?

तसेच मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तब्बल 15 हजार 914 इतकी आहे. त्यामुळे बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची ४६८ पानांची यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेली आहे.

त्यामध्ये सदरील मतदारांची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची योग्य पडताळणी केल्याशिवाय मतदान करू देऊ नये, अशाप्रकारच्या सूचना पोलिंग एजंटला देण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.

Voting
Kasba and Chinchwad : कसब्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. भाजपकडून हेमंत रासने हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मैदानात आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

मात्र, मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे सदरील मतदारांच्या नावे अन्य कोणतीही असंबंधित व्यक्ती मतदान करणार नाही याची काळजी आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com