श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

अशोक गोडसे २०१० पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
Ashok Godse
Ashok GodseSarkarnama
Published on
Updated on

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक प्रतापराव गोडसे (Ashok Godse) यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Ashok Godse
विखुरलेली कॉंग्रेस पुण्यात एकसंधपणे कशी लढणार ?

सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे संचालकही होते. गेल्या काही दिवसांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर दोन आठवड्यांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Ashok Godse
OBC आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती : आगामी निवडणुकांवर प्रश्नचिन्ह

अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरवात केली. १९९६ पासून ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे संचालक होते. २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१० पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. दरवर्षी होणाऱ्या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com