Pune Anti-Encroachment Operation: अतिक्रमण विरोधी कारवाई करताना सुरक्षारक्षकाला मारहाण; पाच जण अटकेत

Pune Crime News : महापालिकेच्या सहायक निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama

Pune News: अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या सहायक निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पुण्यात मंगळवारी घडली होती. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली.

महापालिकेच्या सहायक निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशांत प्रल्हाद कोळेकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Pune Crime News
Pune News: पुणे पालिकेतील उपायुक्त माधव जगताप चुकीचे वागले; खासदार सुळेंनी केली कारवाईची मागणी

या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच जणांना आज अटक करण्यात आली आहे. गणेश परदेशी, रोहित परदेशी, रोहन परदेशी, महेश परदेशी, सूरज परदेशी, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

प्रशांत कोळेकर हे महापालिकेमध्ये सहायक अतिक्रमण निरीक्षक आहेत. ते मंगळवारी ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेजजवळ कैलास स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करत होते. मात्र, याचवेळी ही कारवाई न करण्यासाठी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Pune Crime News
Akot APMC Election : सभापतिपदी ज्येष्ठ, अनुभवी संचालक, की तरुण रक्ताला देणार वाव !

याबरोबरच सुरक्षा रक्षक आकाश लोखंडे यांनाही मारहाण करण्यात आली होती. यामध्ये ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाचजणांना आज अटक करण्यात आली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com