Pune News: पुणे पालिकेतील उपायुक्त माधव जगताप चुकीचे वागले; खासदार सुळेंनी केली कारवाईची मागणी

Supriya Sule on PMC Officer: महापालिका आयुक्त विक्रमकुमार काय कारवाई करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील महापालिकांमध्ये गेल्या वर्षभरात निवडणुका न झाल्याने सर्वच ठिकाणी प्रशासकराज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आधिकाऱ्यांकडून मनमानी करभार सुरू असल्याच्या बातम्या येत असतात. अशीच एक घटना पुण्यात नुकतीच घडली असून त्याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी अतिक्रमविरोधी कारवाई करताना केलेले वर्तन चुकीचे आणि असंवेदनशीलपणाचे असल्याची टीका करीत जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule
Ganesh Sugar Factory Election: गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; विखे पाटलांच्या विरोधात थोरात - अजितदादा उतरणार?

पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान जगताप यांनी खाद्यपदार्थ ठेवलेल्या स्टॉल लाथाडल्याचा ‘व्हीडीओ’ ट्विट करून हा प्रकार समोर आणला आहे. पुणे महापालिकेतील उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्‍चर्य वाटले. महापालिकेचे आधिकारी संवेदशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाणीव असायला हवी. सदर आधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

खासदार सुळे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त विक्रमकुमार काय कारवाई करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. जगताप हे पुणे महापालिकेचे उपायुक्त आहेत.

अतिक्रमण विरोधी विभाग तसेच सुरक्षा विभागाची जबाबदारी जगताप यांच्याकडे आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यानचा गेल्या महिन्यातील हा व्हीडीओ असल्याचे समोर आले असून कारवाई दरम्यान जगताप यांनी संबंधितांना अर्वाच्य भाषा वापरल्याचे सांगण्यात येत आहे.

Supriya Sule
Mla Raju Patil News: जवळ आले नाही तर मारील...; मनसे आमदार राजू पाटील अधिकाऱ्यांवर भडकले

पुणे महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमणांचा विळखा वाढत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई आवश्‍यक आहे. मात्र, कारवाई करताना नियमांचे पालन तितकेच आवश्‍यक आहे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करताना आधिकाऱ्यांनी देखील नियम आणि कायदा पाळण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, महापालिकेच्या आधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यासाठी चुकीची पद्धत अवलंबत असल्याचे दिसत आहे.

उपायुक्त माधव जगताप यांचे कारवाई करतानाचे वर्तन चुकीचे होते. मात्र, त्यामुळे पुण्यातील अतिक्रमणांचा प्रश्‍न दुर्लक्षून चालणार नाही. गेल्या वर्षभरात शहरातील विविध भागातील अतिक्रमणांमध्ये भरच पडली आहे. रोज नव्या जागांवर अतिक्रमण होत आहे. आधीच वाट लागलेल्या पुण्यातील वाहतुकीची आणखी दुर्दशा होत आहे.

त्यामुळे अतिक्रमणांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, कारवाई करताना आधिकाऱ्याचे वर्तन तितकेच नियमात बसणारे हवे. माधव जगताप यांच्यावर कारवाई करताना पुण्यातील अतिक्रणांवरदेखील कारवाई करण्याची गरज आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यास महापालिका जबाबदार आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com