Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदार संघातून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपमधून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कुणाल टिळक आणि धीरज घाटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बडांचे निशाण फडकवला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात धंगेकरविरुद्ध रासने, असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार हे निश्चित झालं आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपने (BJP) रासने यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे.
रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज झाल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. धीरज घाटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये धीरज घाटे यांनी "तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण 30 वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय", शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर यांची देखील डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.
कमल व्यवहारे यांचे सध्या एक पत्रक व्हायरल होत आहे. त्यामध्ये 10 वर्षात 5 पक्ष बदलून आलेली मंडळी पक्षापेक्षा स्वतःला मोठी समजू लागल्याचा फटका लोकसभेला बसला, आता त्यांना कसबा विधानसभेचे उमेदवारी देण्यात आलं असल्याचं म्हणत कमल व्यवहारे यांनी नाराज व्यक्त केली आहे.
दरम्यान कमल व्यवहारे या काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे त्या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार होऊ शकतात, अशा चर्चा आहेत. तसं न झाल्यास त्या अपक्ष म्हणून देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.